Flydubai Pilot Attack NIA Case : 'फ्लायदुबई' पायलट स्मित मच्छारांवरील हल्ल्याची भारत करणार चौकशी; 'NIA'कडून गुन्‍हा दाखल

विमान अपहरण-विरोधी कायदा आणि यूएपीए अंतर्गत होणार कारवाई
Flydubai Pilot Attack NIA Case
Flydubai Pilot Attack NIA Case : 'फ्लायदुबई'च्या विमानातील कॉकपिटमध्ये सह-पायलटच्‍या हल्‍ल्‍यात स्‍मित मच्‍छार जखमी झाले होते. pUDHARI
Published on: 
Updated on: 

Flydubai pilot attack NIA case : 'फ्लायदुबई'च्या विमानातील कॉकपिटमध्ये भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर ३० सप्टेंबर रोजी झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुन्हा दाखल केला आहे, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.

विमान अपहरण-विरोधी कायदा आणि यूएपीए अंतर्गत गुन्‍हा दाखल

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, ९ ऑक्टोबर रोजी 'विमान अपहरण-विरोधी कायदा, २०१६' (Anti-Hijacking Act) आणि 'बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, १९६७' (UAPA) च्या संबंधित कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Flydubai Pilot Attack NIA Case
Flydubai co-pilot | होय, मला विमान पाडायचे होते! फ्लायदुबईचा सहवैमानिक हम्माम अल-हम्मामीची कबुली

सह-पायलटच्‍या हल्‍ल्‍यात स्‍मित मच्‍छार गंभीर जखमी

दुबई ते तेल अवीव प्रवासादरम्यान 'फ्लायदुबई'च्या FZ1073 या विमानातील कॉकपिटमध्ये सह-पायलटने स्मित मच्छार यांच्यावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. विमान हायजॅक करण्याच्या किंवा ते पाडण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. जखमी असूनही, मच्छार यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले; यामुळे इतरांना हल्लेखोराला ताब्यात घेणे शक्य झाले आणि संभाव्य दुर्घटना टळली. त्यानंतर विमान सौदी अरेबियातील तबुककडे वळवण्यात आले, जिथे जखमी पायलटवर तातडीचे उपचार करण्यात आले आणि नंतर पुढील उपचारांसाठी त्यांना अबू धाबीला हलवण्यात आले होते.

Flydubai Pilot Attack NIA Case
Flydubai co pilot attack : फ्लायदुबईसारखे हल्ले पुन्हा होतील..." : अल-कायदाची उघड धमकी

पंतप्रधान मोदींनी केले होते स्‍मित यांच्‍या धैर्याचे कौतूक

घटनेनंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मच्छार यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या धैर्याचे व प्रसंगावधानाचे कौतुक केले. त्यांच्या या कृतीचे भारतीय अधिकाऱ्यांनी तसेच इस्रायल (पंतप्रधान नेतान्याहू यांच्यासह) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अधिकाऱ्यांनीही कौतुक केले. मच्छार यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून ते अबू धाबीमध्ये उपचार घेत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सुधारत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news