Flydubai co pilot attack : फ्लायदुबईसारखे हल्ले पुन्हा होतील..." : अल-कायदाची उघड धमकी

इस्लामच्या विरोधात लढणाऱ्यांना घेऊन जाणारी विमाने टार्गेटवर
Flydubai co pilot attack Al Qaeda threat
प्रातिनिधिक छायाचित्र. file photo
Published on: 
Updated on: 

Flydubai co pilot attack Al Qaeda threat : "युद्ध अजून संपलेले नाही. इस्लामच्या विरोधात लढणाऱ्यांना घेऊन जाणारी विमाने अजूनही आकाशात उडत आहेत आणि त्यांना लक्ष्य केले जाऊ शकते," अशी उघड धमकी अल-कायदाशी संबंधित एका प्रकाशनाने दिली आहे. ३० सप्टेंबर रोजी दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानातील कॉकपिटमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर ही धमकी मिळाली आहे. फ्लायदुबईचा सह-वैमानिक (को-पायलट) हमम अल-हमामी याच्या चौकशीदरम्यान ही नवीन बाब समोर आली आहे.

फ्लायदुबईच्या सहवैमानिकाची चौकशी

३० सप्टेंबरला ओमानचा नागरिक आणि सहवैमानिक अल-हमामीने FZ 1073 या विमानातील कॉकपिटमध्ये कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर 'क्रॅश ॲक्स'ने (आणीबाणीच्या वेळी वापरली जाणारी कुऱ्हाड) हल्ला केला. विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. तपासाचा एक भाग म्हणून त्याच्या सोशल मीडिया खात्यांचीही छाननी केली जात आहे; त्यावर अमेरिकेच्या लष्करी कारवाईत ठार झालेला अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन आणि अयमान अल-जवाहिरी यांच्यासह अनेक व्यक्तींशी संबंधित मजकूर आढळून आला आहे.

Flydubai co pilot attack Al Qaeda threat
Flydubai co-pilot | ‘फ्लायदुबई’च्या विमानातील सहवैमानिक दहशतवादीच

हल्लेखोराच्या सोशल मीडियाची तपासणी

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले की, हल्लेखोर कट्टरपंथी विचारसरणीने प्रभावित होता. विमानाचा अपघात घडवून त्यातील प्रवाशांचा बळी घेण्याचा त्याचा उद्देश होता. इस्रायली अधिकाऱ्यांनीही तो अतिरेकी विचारसरणीच्या संपर्कात असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. अल-हमामीशी संबंधित सोशल मीडिया खात्यांवर सापडलेल्या मजकुरामुळे तपासाला एक नवीन वळण मिळाले आहे. या खात्यांवरील काही पोस्ट्समध्ये कॉकपिटमधील व्हिडिओ आणि जवळच असलेल्या इस्रायली विमानाकडे कॅमेरा फिरवतानाचे फुटेज दिसून आले.

Flydubai co pilot attack Al Qaeda threat
Flydubai Pilot Attack : फ्लायदुबईच्या सहवैमानिकाने कुऱ्हाडीने कॅप्टनवर केला हल्ला; यूएईचा दावा

अल-हमामीबद्दल आणखी काेणती माहिती समोर आली?

रिपोर्टनुसार, अल- हमामीचा अयमान अल-जवाहिरीचा फोटो दिसून आला. तसेच, २००९ मध्ये अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला करणाऱ्या हुमाम खलील अबू-मुलाल अल-बालावी याचाही त्यात उल्लेख होता. तथापि, अल-हमामीने हे स्वतः पोस्ट केले होते की, त्याच्या नावाचा वापर करून दुसऱ्या कोणीतरी पोस्ट केले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यानंतर काही खाती डिलीट करण्यात आली. फ्लायदुबईमध्ये रुजू होण्यापूर्वी, अल-हमामी यांनी ओमान एअर आणि रॉयल एअर मारोकसाठी काम केले होते. ओमान एअरमधील त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या अतिरेकी विचारांबाबत प्रश्न उपस्थित केले गेले होते आणि त्यांना उड्डाणाशी संबंधित कर्तव्यांवरून हटवून प्रशासकीय जबाबदाऱ्यांवर नियुक्त करण्यात आले होते.

Flydubai co pilot attack Al Qaeda threat
Flydubai Flight Emergency Landing : 'लढाऊ विमाने तातडीने रवाना करण्यात आली': 'फ्लायदुबई' घटनेबाबत इस्रायलचा धक्कादायक खुलासा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news