Booking.com Investigation: Booking.com अडचणीत! ग्राहकांची फसवणूक आणि जाहिरातींबाबत युरोपियन युनियनकडून चौकशी होणार, काय आहे प्रकरण?

Booking.com Fraud Investigation: डिजिटल सेवा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यास कंपनीवर कारवाई होऊ शकते.
Booking.com Fraud Investigation
Booking.com Fraud InvestigationPudhari
Published on: 
Updated on: 

Booking.com Fraud Investigation: ऑनलाइन हॉटेल बुकिंगसाठी लोकप्रिय असलेल्या Booking.com या प्लॅटफॉर्मच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ग्राहकांची फसवणूक, बनावट हॉटेल लिस्टिंग आणि आरक्षणाशी संबंधित माहितीचा गैरवापर होत असल्याच्या मुद्द्यांवर युरोपियन युनियनने कंपनीविरोधात औपचारिक चौकशी सुरू केली आहे.

बनावट हॉटेल लिस्टिंगची होणार तपासणी

युरोपियन कमिशन Booking.com वर दाखवल्या जाणाऱ्या हॉटेल जाहिरातींची तपासणी करणार आहे. या प्लॅटफॉर्मवर अस्तित्वात नसलेल्या मालमत्तांची बनावट माहिती, दुसऱ्याची ओळख वापरून केली जाणारी फसवणूक आणि नियमांचे पालन न करणाऱ्या जाहिराती दाखवल्या जातात का, याचा शोध घेतला जाणार आहे.

अशा बनावट जाहिरातींमुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीचा धोका ओळखण्यासाठी आणि तो रोखण्यासाठी Booking.com ने योग्य उपाययोजना केल्या आहेत का, हेही तपासले जाईल. फसवणूक करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जाहिराती वेळेत हटवल्या जातात का, याचीदेखील चौकशी होणार आहे.

आरक्षणाच्या माहितीचा वापर करून फसवणूक?

Booking.com वर हॉटेल बुक केल्यानंतर ग्राहकांना आरक्षणाशी संबंधित मेसेज आणि माहिती मिळते. या प्रक्रियेत ग्राहकांची वैयक्तिक माहिती आणि आरक्षणाचा तपशील हॉटेल चालकांसोबत कशा प्रकारे शेअर केला जातो, याची युरोपियन कमिशन तपासणी करणार आहे.

या माहितीचा वापर करून ग्राहकांना बनावट मेसेज पाठवले जातात का, हाही चौकशीचा महत्त्वाचा भाग आहे. उदाहरणार्थ, ग्राहकाने केलेल्या बुकिंगचा संदर्भ देऊन त्याला मेसेज पाठवला जाऊ शकतो. त्यात पैसे भरण्यासाठी बनावट लिंक दिली जाऊ शकते. ग्राहकाने त्या लिंकवर विश्वास ठेवून पैसे भरल्यास त्याची फसवणूक होण्याची शक्यता असते. अशा प्रकारचे फिशिंग घोटाळे रोखण्यासाठी Booking.com ने पुरेशी सुरक्षा व्यवस्था उभी केली आहे का, हे कमिशन तपासणार आहे.

Booking.com Fraud Investigation
Asian Para Games: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूवर गंभीर आरोप; महिला कर्मचाऱ्यावर जबरदस्ती, जपान पोलिसांनी केली कारवाई, काय घडलं?

पैसे देऊन वरच्या क्रमांकावर येणाऱ्या जाहिरातींवरही प्रश्न

या चौकशीतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पैसे देऊन सर्च यादीत वरच्या क्रमांकावर येणाऱ्या हॉटेलच्या जाहिराती.

एखादे हॉटेल सर्च यादीत सर्वात वर दिसत असेल, तर ते ग्राहकाच्या गरजांशी अधिक जुळणारे असल्यामुळे दिसते की हॉटेल चालकाने अधिक पैसे दिल्यामुळे, हे ग्राहकांना समजणे आवश्यक आहे, असे युरोपियन कमिशनचे म्हणणे आहे.

जाहिरात कोणी दिली, त्यासाठी पैसे कोणी भरले, ती जाहिरात आपल्याला का दाखवली जात आहे आणि अशा जाहिराती ठरवणाऱ्या सेटिंग्जमध्ये बदल कसा करता येईल, ही माहिती ग्राहकांना सहज उपलब्ध असणे आवश्यक आहे.

Booking.com Fraud Investigation
Stock Market Crash: ज्याची भीती होती, तेच घडलं! शेअर बाजार उघडताच क्रॅश; 'हे' शेअर्स पत्त्यांसारखे कोसळले

डिजिटल सेवा कायद्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई शक्य

Booking.com ने कायद्याचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाल्यास कंपनीवर कारवाई होऊ शकते. चौकशीदरम्यान आवश्यक वाटल्यास युरोपियन कमिशन तात्पुरते आदेश देऊ शकते किंवा कंपनी नियमांचे पालन करत नसल्याचा अधिकृत निर्णय घेऊ शकते. नियमांचे पालन करण्यासाठी Booking.com ने उपाय सुचवल्यास ते स्वीकारण्याचाही अधिकार कमिशनकडे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news