Earthquake| जम्‍मू काश्मीर आणि गुजरातमध्ये भूकंपाचे धक्‍के, रिश्टर स्‍केलवर होती इतकी तीव्रता

या भूकंपात कोणतीही जीवितहानी नाही
Earthquake
Earthquake| जम्‍मू काश्मीर आणि गुजरातमध्ये भूकंपाचे धक्‍के, रिश्टर स्‍केलवर होती इतकी तीव्रताFile Photo
Published on
Updated on

earthquake jolts jammu kashmir and gujarat

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

जम्‍मू काश्मीर आणि गुजरातमध्ये भूकंपाचे धक्‍के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता कमी हाेती. त्‍यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Earthquake
Pakistani Artists Instagram Account Banned | अभिनेता फवाद खान, आतिफ अस्लमसह ८ पाकिस्तानी कलाकारांचे 'इन्स्टाग्राम' भारतात बंद

गुजरातमध्ये शुक्रवारी रात्री ३.४ तीव्रतेचा भूकंप झाला. तर जम्‍मू काश्मीरमध्ये रात्री झालेल्‍या भूकंपाची तीव्रता २.७ इतकी नोंदवली गेली. लेह लडाखमध्येही भूकंपाचे धक्‍के जाणवले आहेत. या ठिकाणच्या भूकंपाची तीव्रता ३.९ इतकी नोंदवली गेली.

Earthquake
National Register of Citizens | एनआरसीचे काम लवकरच सुरू व्हावे : विहिंप

गुजरामध्ये भूकंपाचा अधिक धोका

गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (GSDMA) नुसार, गुजरात भूकंपाच्या बाबतीत उच्च जोखीम असलेले क्षेत्र आहे. गेल्या २०० वर्षांत येथे नऊ मोठे भूकंप झाले आहेत. जीएसडीएमएच्या मते, २६ जानेवारी २००१ रोजी कच्छमध्ये झालेला भूकंप गेल्या दोन शतकांमध्ये भारतात आलेला तिसरा सर्वात मोठा भूकंप होता. अंदाजे १३,८०० लोक मृत्युमुखी पडले आणि १.६७ लाख लोक जखमी झाले.

Earthquake
Pahalgam Attack | पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफांचे यूट्यूब चॅनल भारतात बंद

भूकंप का होतात?

पृथ्वीच्या पृष्ठभागावर घडणाऱ्या नैसर्गिक घटनांमुळे भूकंप होतात. पृथ्वीच्या अंतर्गत रचनेत होणाऱ्या ताणतणाव आणि क्रियाकलापांमुळे हे प्रामुख्याने आपत्ती म्हणून घडतात. भारतात भूकंप येण्याचे मुख्य कारण म्हणजे हिमालयीन प्रदेशातील टेक्टोनिक क्रियाकल्‍प. येथील तणाव भारतीय प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यातील होणाऱ्या धडकेमुळे आहे. यामुळे ऊर्जा निर्माण होते आणि भूकंप होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news