National Register of Citizens | एनआरसीचे काम लवकरच सुरू व्हावे : विहिंप

Vishw Hindu Parishad | पहलगाम हल्‍ल्‍यानंतर परिषदेने केली मागणी
National Register of Citizens
canva
Published on
Updated on

नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, विश्व हिंदू परिषदेने (VHP) पुन्हा एकदा राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) चा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे या दिशेने लवकरच काम सुरू करण्याची मागणी केली आहे. एनआरसीच्या अंमलबजावणीमुळे देशातून स्लीपर सेल म्हणून काम करणाऱ्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यास मदत होईल, असे विहिंपचे म्हणणे आहे.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हिंदूंच्या क्रूर हत्याकांडानंतर केंद्र सरकारने उचललेल्या पावलांचे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त महासचिव डॉ. सुरेंद्र जैन यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, सरकारच्या या पावलांमुळे पाकिस्तानचे वास्तव समोर येत आहे. एवढेच नाही तर देशात राहणारे देशद्रोही चेहरेही समोर येत आहेत. ते म्हणाले की, अशा लाखो महिला पुढे आल्या आहेत ज्यांचे पती पाकिस्तानी मुस्लिम आहेत आणि त्यांच्याकडे पाकिस्तानचे पासपोर्ट देखील आहेत, परंतु त्या महिला आणि त्यांची मुले भारताचे नागरिक आहेत.

image-fallback
राष्ट्रीय नागरिक नोंदणी का आवश्यक?

अशी हजारो प्रकरणे आहेत ज्यात एका भारतीय मुस्लिम महिलेने पाकिस्तानीशी लग्न केले आणि स्वतः पाकिस्तानी नागरिकत्व घेतले परंतु तिच्या मुलांसाठी भारतीय नागरिकत्व मिळवले. हे सर्व लोक केवळ भारतात उपलब्ध असलेल्या सुविधांचा फायदा घेत नाहीत तर भारताच्या पैशावर भरभराट करून भारताच्या मुळांवरही हल्ला करत आहेत. त्यांना पाकिस्तानबद्दल सहानुभूती आहे आणि 'पाकिस्तान मुर्दाबाद' सारख्या घोषणा ऐकून ते हिंसक होतात. खरंतर असे लोक पाकिस्तानसाठी स्लीपर सेल म्हणून काम करतात. अशा लोकांना देशाबाहेर हाकलून लावणे आवश्यक आहे. यासाठी एनआरसी खूप उपयुक्त ठरू शकते.

image-fallback
एनआरसीच्या भीतीने अवैध बांगलादेशींची घरवापसी

व्हीएचपीने एनआरसी लवकर तयार करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, येत्या जनगणनेसोबत एनआरसी देखील तयार केले पाहिजे. जेणेकरून भारतविरोधी लोकांना तात्काळ बाहेर काढता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news