Umar Mohammad Video: मृत्यू हे एकमेव ध्येय.... दिल्ली बॉम्ब ब्लास्ट घडवून आणणाऱ्या मोहम्मद उमर नबीचा नवा Video आला समोर

Delhi Car Bomb Blast:दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवून आणणारा मुख्य आरोपी मोहम्मद उमर नबी याचा आत्मघातकी बॉम्बस्फोटांवर बोलणारा एक नवा सेल्फ व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो आत्मघातकी बॉम्बिंगवर बोलताना म्हणतो की, "आत्मघातकी हल्ल्यातील व्यक्तीची मानसिकता अशी होते की, मृत्यू हेच त्याचे एकमेव ध्येय असते." व्हिडिओ पूर्णपणे स्पष्ट नसला तरी, हा व्हिडिओ दहशतवाद्यांची धोकादायक मानसिकता समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
Umar Mohammad
Umar MohammadPudhari photo
Published on
Updated on

Delhi Blast Umar Mohammad Suicide Bombing:

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्फोट घडवून आणणाऱ्या मोहम्मद उमर नबी या दहशतवाद्याचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तो इंग्रजीमधून आत्मघातकी बॉम्बस्फोटाबाबत माहिती देतोय अन् आत्मघातकी बॉम्बस्फोट आणि तो करणाऱ्याची मानसिकता याबाबत सांगताना दिसतोय.

Umar Mohammad
Al-Falah University ED Raid: पहाटे अल - फलह विद्यापीठावर ED चे छापे; स्फोटक पदार्थ, गाडीबाबतचे धागेदोरे लागले हाती?

या व्हिडिओत उमर मोहम्मद उर्फ उमर उन नबी हा एकटाच आहे. हा त्याचा सेल्फ व्हिडिेओ आहे. या व्हिडिओत उमर मोहम्मद हा आत्मघातकी बॉम्बिंग हे योग्यरित्या समजून घेतलं गेलेलं नाही असं म्हणतोय.

मोहम्मद या व्हिडिओत म्हणतो, 'लोक आत्मघातकी बॉम्बिंगला समजण्यात अपयशी ठरतात.इथं लोकं मोठी चूक करतात. बॉम्ब स्फोटाचा किंवा आत्मघातकी बॉम्ब स्फोटाचा विचार नेमका काय आहे. त्याच्याविरूद्ध अनेक विरोधाभास आणि अनेक तर्क आहेत.'

Umar Mohammad
‌Delhi Car Blast : ‘शू बॉम्बर‌’ उमरने बुटातील ट्रिगरने घडवला कार बॉम्ब

दिल्ली बॉम्ब ब्लास्टमधील मुख्य आरोपी उमर मोहम्मद पुढे म्हणतो, 'आत्मघातकी हल्ल्याची मुख्य समस्या ही ज्यावेळी एखादी व्यक्ती मान्य करते की त्याचा मृत्यू एका निश्चित वेळी आणि निश्चित स्थानावर होणार आहे त्यावेळी तो एका धोकादायक मानसिकतेत जातो. त्यावेळी तो व्यक्ती मानतो की त्याचा मृत्यू हे त्याचे एकमेव ध्येय आहे.'

Umar Mohammad
Delhi Red Fort Blast | डॉ. उमर चालवत होता ‘कन्व्हर्जन फॅक्टरी’; पदाचा गैरवापर करून तरुणांवर जाळे

'मात्र सत्य हे आहे की असा विचार, अशी परिस्थिती कोणत्याही लोकशाही या मानवी व्यवस्थेत स्वाकार्य नाही. कारण हा विचार जीवन, समाज आणि कायदा या मुलभूत सिद्धांतांचे उल्लंघन करतो.'

Umar Mohammad
Red Fort Blast |लाल किल्ला स्फोट प्रकरणातील नऊ एमएम कॅलिबरची काडतुसे जप्त

उमर मोहम्मदचा हा नवा व्हिडिओ एवढाच आहे. त्यामुळं त्याचे आत्मघातकी बॉम्ब हल्ल्याबाबत काय विचार आहेत हे स्पष्ट होत नाहीत. मात्र या व्हिडिओत उमर हा खूप शांत आणि सहज वाटतोय. मात्र हा व्हिडिओ दहशतवाद्यांची सायकॉलॉजी समजून घेणाऱ्यांसाठी खूप महत्वाचा असू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news