Al-Falah University ED Raid: पहाटे अल - फलह विद्यापीठावर ED चे छापे; स्फोटक पदार्थ, गाडीबाबतचे धागेदोरे लागले हाती?

पहाटे ५:२५ वाजता कारवाई; वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती आणि माजी विद्यार्थ्यांचे कनेक्शन तपास यंत्रणांच्या रडारवर.
Al-Falah University
Al-Falah Universitypudhari photo
Published on
Updated on

Al-Falah University Delhi Car Blast Probe:

सक्तवसुली संचलनालयानं दिल्ली कार ब्लास्ट प्रकरणी अल फलह विद्यापीठाच्या ओखला ऑफिसमध्ये छापे मारले. विशेष म्हणजे ईडीनं ही छापेमारी भल्या पहाटे ५ वाजून २५ मिनिटांनी केली. त्यांनी दिल्लीतील विविध ठिकाणी ही छापेमारी केली. याबाबतचे वृत्त एएनआयनं दिलं आहे.

Al-Falah University
Delhi Car Blast |दिल्ली स्फोटातील कारचा मालक आमिरला अटक

व्हाईट कॉलर टेरर नेटवर्क

दिल्ली कार ब्लास्ट प्रकरणाची चौकशी आता व्हाईट कॉलर टेरर नेटवर्कभोवती एकवटत आहे. यात वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती आणि अल फलह विद्यापीठाशी संबंधित व्यक्तींवर तापास यंत्रणांची विशेष नजर असणार आहे. तपास यंत्रणांनी या छापेमारीत महत्वाचे पुरावे, स्फोटात वापरलेल्या गाडीच्या संदर्भातील धारे दोरे, बऱ्याच प्रमाणात स्फोटक पदार्थ ताब्यात घेतले आहेत. यावरून व्हाईट कॉलर दहशतवादी हे अजून मोठं अन् सुनियोजित ओपरेशन राबवणार होते का अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Al-Falah University
Delhi Red Fort blast : दिल्ली कार स्फोटाच्या ठिकाणी सापडले फक्त लष्कराकडे असणारे 9mm काडतुसे; तपासात मोठा गौप्यस्फोट

कुलगुरूंना घेतलं ताब्यात

अल-फलह विद्यापीठावर झालेली ही छापेमारी विद्यापीठाचे कुलगुरू यांना हैदराबादमधून अटक केल्यानंतर पुढच्याच दिवशी करण्यात आली आहे. कुलगुरूंना २५ वर्षापूर्वीच्या एका फसवणुकीच्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं आहे.

१० नोव्हेंबरला दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार ब्लास्ट प्रकरणात अनेक डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. त्यांचे सर्वांचे कनेक्शन हे अल-फलह विद्यापीठाशी होते. तेव्हापासूनच अल-फलह विद्यापीठ हे रडारवर आलं होतं.

दिल्ली लाल किल्ला कार ब्लास्ट प्रकरणातील प्रमुख आरोपी डॉक्टर उमर उन नबी हा अल-फलह विद्यापीठाचा माजी विद्यार्थी होता.

Al-Falah University
विधानसभा निवडणुकीत टेरर फंडचा वापर : मुख्यमंत्री

विद्यापीठाला नोटीस

दरम्यान, दिल्ली ब्लास्टमध्ये सातत्यानं संस्थेचं नाव येऊ लागल्यावर संस्थेनं एक वक्तव्य प्रसिद्ध केलं. त्यात त्यांनी दिल्ली कार ब्लास्टचा निषेध केला आणि संस्था ही एक जबाबदार शैक्षणिक संस्था असून ते राष्ट्रहिताला बांधील असल्याचं सांगितलं.

दिल्ली ब्लास्टमधील तपासाचा भाग म्हणून दिल्ली पोलिसांनी विद्यापीठीच्या कुलगुरूंना दोन नोटीस पाठवल्या आहेत. त्यात त्यांनी संस्थेच्या कारभारात काही विसंगती आढळून आल्या आहेत. काही व्यक्तींच्या संस्थेतील रोलबाबत शंका आहेत. त्याबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

Al-Falah University
केंद्रीय गृहमंत्री ॲक्शन मोडमध्ये, जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये ‘झिरो टेरर प्लॅन’च्‍या पुनरावृत्तीचे आदेश

तापस यंत्रणा या दिल्ली स्फोटाशी कनेक्शन असलेल्या संशयिताचा आणि विद्यापीठाचे संभाव्य कनेक्शन याबाबत चौकशी करत आहेत. तापस यंत्रणा संस्थेचे रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार, प्रशासकीय निर्णय या सर्वांची चौकशी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news