DK Shivakumar: सफरचंद खाल्लं अन गर्दीत भिरकावलं! कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा VIDEO व्हायरल

कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Karnataka CM DK Shivakumar apple viral video
Karnataka CM DK Shivakumar apple viral videofile photo
Published on
Updated on

Karnataka CM DK Shivakumar apple viral video

बंगळूर: कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या व्हिडिओमध्ये शिवकुमार सफरचंदचा एक तुकडा खातात आणि उरलेले सफरचंद समोर असलेल्या समर्थकांच्या गर्दीत भिरकावताना दिसत आहेत. या प्रकारानंतर सोशल मीडियावर संमिश्र आणि तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

हा व्हिडिओ डी. के. शिवकुमार यांच्या कनकपुरा येथील होराहल्ली गावातील दौऱ्यादरम्यानचा आहे. शिवकुमार यांचे स्वागत करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी तेथे मोठी गर्दी केली होती. त्यांच्या भव्य स्वागतासाठी समर्थकांनी ताजी सफरचंदे आणि फुलांचा वापर करून एक प्रचंड मोठा हार तयार केला होता.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, शिवकुमार या भव्य हारातील एक सफरचंद तोडतात, त्याचा एक तुकडा खातात आणि उर्वरित भाग थेट समोर उपस्थित असलेल्या समर्थकांच्या दिशेने फेकून देतात. त्यांनी सफरचंद फेकताच, तिथे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये ते पकडण्यासाठी एकच झुंबड उडाल्याचेही व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

Karnataka CM DK Shivakumar apple viral video
DK Shivakumar Cabinet: तिकडं तृणमूल इकडं काँग्रेस... आमदारांची नाराजी काही संपेना; कर्नाटकात मंत्र्याचा शपथविधीनंतर दोन दिवसातच राजीनामा

नेटकऱ्यांचा संताप; सरंजामी मानसिकतेवर टीका

कनकपुराचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर दोन तट पडले आहेत. समर्थकांनी या घटनेचे समर्थन करत, हा नेता आणि जनतेमधील आपुलकीचा आणि 'प्रसादा'चा भाग असल्याचे म्हटले आहे. मात्र, दुसरीकडे विरोधक आणि सामान्य नेटकऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे उष्टे अन्न फेकण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

"ते स्वतःला देव समजतात का?"

एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले, "डी. के. शिवकुमार स्वतःला कोणी देव समजतात का? सफरचंदाचा तुकडा खाऊन ते लोकांमध्ये प्रसादासारखा वाटत आहेत, यामागे काय तर्क आहे?" दुसऱ्या एका युजरने नाराजी व्यक्त करत लिहिले की, "हे नेतृत्वाचे लक्षण नसून जुनाट सरंजामी मानसिकतेचे दर्शन आहे. अर्धे खाल्लेले सफरचंद गर्दीत फेकणे आणि लोकांनी ते पकडण्यासाठी धावणे अत्यंत अपमानास्पद आहे."

दरम्यान, या व्हिडिओवरून सोशल मीडियावर जोरदार राजकीय आणि सामाजिक चिखलफेक सुरू असून, यावर अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.

Karnataka CM DK Shivakumar apple viral video
DK Shivakumar Net Worth: फक्त एक कार नावावर; 263 कोटी रुपयांचं तर कर्जच आहे, डीके शिवकुमार यांची संपत्ती किती?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news