Divya Mittal: राजीनामा देणाऱ्या माजी IAS अधिकारी दिव्या मित्तल राजकारणात; कोणत्या पक्षात जाणार? VIDEO चर्चेत

उत्तर प्रदेश केडरच्या २०१३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आणि मिर्झापूरच्या माजी जिल्हाधिकारी दिव्या मित्तल यांनी आपल्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Ex IAS officer Divya Mittal
Ex IAS officer Divya MittalFile Photo
Published on: 
Updated on: 

Ex IAS officer Divya Mittal

लखनऊ: उत्तर प्रदेश केडरच्या २०१३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आणि मिर्झापूरच्या माजी जिल्हाधिकारी दिव्या मित्तल यांनी आपल्या राजीनाम्यानंतर अखेर मौन सोडले असून, त्यांनी थेट राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी लोकांचा आवाज बनण्यासाठी आपण राजकारणात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

लोकांचा आवाज बनण्याचा संकल्प

काही दिवसांपूर्वीच दिव्या मित्तल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, ज्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मी काही दिवसांपूर्वीच आयएएस पदाचा राजीनामा दिला असून, तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये दिली आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की हा तुमचाही प्रश्न आहे, तर या पोस्टवर नक्की कमेंट करा किंवा दिलेल्या क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेज करा."

Ex IAS officer Divya Mittal
IAS officer Divya Mittal: १३ वर्षांच्या सेवेनंतर IAS अधिकारी दिव्या मित्तल यांचा राजीनामा; कारण काय? भावनिक पोस्ट व्हायरल

सर्वोच्च पदांवर काम केल्यानंतर आता पुढे काय, असा प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर देताना त्या म्हणाल्या, "मी प्रशासकीय सेवेत सर्वकाही मिळवले आहे, परंतु आता मला राजकारणात येऊन सर्वसामान्यांचा आवाज बनायचे आहे. ज्या लोकांचा आवाज कुठल्याही शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचत नाही आणि पोहोचला तरी त्यावर उत्तर मिळत नाही, अशा उपेक्षितांची बाजू मला मांडायची आहे."

कोण आहेत दिव्या मित्तल?

मूळच्या दिल्लीच्या असणाऱ्या २३ नोव्हेंबर १९८३ रोजी जन्मलेल्या दिव्या मित्तल यांनी अत्यंत प्रतिभावान विद्यार्थी म्हणून शैक्षणिक व व्यावसायिक प्रवास केला आहे. त्यांनी आयआयटी दिल्ली आणि IIM बेंगळूर मधून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी तब्बल दोनदा युपीएससी परीक्षा यशस्वरीत्या उत्तीर्ण केली. २०११ मध्ये यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया १३४ वी रँक मिळवून त्यांची आयपीएस पदी निवड झाली होती. त्यानंतर २०१२ च्या यूपीएससी परीक्षेत ६८ वी रँक मिळवून त्या आयएएस अधिकारी बनल्या आणि त्यांना उत्तर प्रदेश केडर मिळाले. त्यांचे पती गगनदीप सिंह ढिल्लों हे देखील २०११ च्या बॅचचे इंडियन ट्रेड सर्व्हिसचे अधिकारी होते, ज्यांनी २०२२ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या दांपत्याला दोन मुली आहेत. लंडनमध्ये एकत्र नोकरी केल्यानंतर त्यांनी भारतात परत येऊन यूपीएससीची तयारी केली होती.

दिव्या मित्तल यांची सेवा कारकीर्द

IAS अधिकारी बनल्यानंतर, दिव्या मित्तल यांनी २ सप्टेंबर २०१३ रोजी उत्तर प्रदेश केडरमध्ये नागरी सेवेत प्रवेश केला. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, २७ नोव्हेंबर २०१५ रोजी मेरठ येथे 'जॉइंट मॅजिस्ट्रेट' म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली. मेरठनंतर, दिव्या मित्तल यांनी गोंडा येथे मुख्य विकास अधिकारी (CDO) (२०१७-२०१८) आणि कानपूर नगर येथील UPSIDC च्या सह-व्यवस्थापकीय संचालक (२०१८-२०१९) म्हणून काम पाहिले. २०१९ ते २०२० या काळात त्यांनी बरेली विकास प्राधिकरणासोबत काम केले. २०२० मध्ये त्या पहिल्यांदा संत कबीर नगरच्या जिल्हा दंडाधिकारी बनल्या. संत कबीर नगरनंतर, दिव्या मित्तल यांनी २०२२ मध्ये मिर्झापूर आणि २०२४ मध्ये देवरिया येथे जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर, ५ मे २०२६ रोजी त्यांची बदली लखनौ येथील महसूल विभागाच्या विशेष सचिव या पदावर करण्यात आली. ही त्यांची शेवटची नियुक्ती होती.

Ex IAS officer Divya Mittal
PM Narendra Modi | 'सोमनाथ'ची ओळख मिटवू पाहणारे इतिहासजमा, मंदिर मात्र आजही उभे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news