PM Narendra Modi | 'सोमनाथ'ची ओळख मिटवू पाहणारे इतिहासजमा, मंदिर मात्र आजही उभे

‘मन की बात’मध्ये सोमनाथ स्वाभिमान पर्वाचा उल्लेख
PM Narendra Modi |
PM Narendra Modi | 'सोमनाथ'ची ओळख मिटवू पाहणारे इतिहासजमा, मंदिर मात्र आजही उभे
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : सोमनाथ मंदिराची ओळख पुसण्याचा प्रयत्न करणारे आज इतिहासाच्या पानांपुरते मर्यादित राहिले आहेत, तर सोमनाथ मंदिर आजही अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर भव्यतेने उभे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या १३८ व्या भागात केले. सन १०२६ मध्ये महमूद गझनीने सोमनाथ मंदिरावर केलेल्या पहिल्या हल्ल्याला यंदा एक हजार वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ‘सोमनाथ स्वाभिमान पर्वा’चा उल्लेख केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, सोमनाथ मंदिरावर झालेल्या हल्ल्याच्या स्मरणासोबतच त्यानंतर मंदिराच्या पुनर्निर्माणाचा झालेला प्रवासही महत्त्वाचा आहे. मंदिरावर अनेकदा हल्ले झाले, मात्र प्रत्येक वेळी त्याचे पुनर्निर्माण झाले. आज सोमनाथ मंदिर पूर्ण भव्यतेने उभे असून, या ऐतिहासिक वारशाचा देशाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

मोढेरा सूर्य मंदिराचा उल्लेख

सोमनाथवरील हल्ल्याच्या काळातच गुजरातमधील मोढेरा येथील प्रसिद्ध सूर्य मंदिरावरही हल्ला झाल्याचे मोदी यांनी सांगितले. १०२५ मध्ये राजा भीमदेव प्रथम यांनी या मंदिराची निर्मिती केली होती. त्यानंतर १०२६ मध्ये गझनीच्या आक्रमणात मंदिराचे नुकसान झाले. राजा भीमदेव यांनी आक्रमणाचा सामना करण्याबरोबरच मोढेरा सूर्य मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी प्रयत्न केल्याचा उल्लेख मोदी यांनी केला. मोढेरा सूर्य मंदिरावर नंतरच्या काळातही हल्ले झाल्याचे सांगत मोदी यांनी मंदिराच्या सांस्कृतिक वारशाबरोबरच आजच्या मोढेराने आधुनिक क्षेत्रातही वेगळी ओळख निर्माण केल्याचे नमूद केले. मोढेरा हे देशातील पहिले सौरग्राम म्हणून ओळखले जाते. गावातील वीजव्यवस्थेसाठी सौरऊर्जेचा वापर करून मोढेराने शाश्वत ऊर्जेचे उदाहरण देशासमोर ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले.

मोढेरा नृत्य महोत्सव

पर्यटनाच्या दृष्टीनेही मोढेरामध्ये विविध सुविधा विकसित करण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले. मकरसंक्रांतीनंतर येथे मोढेरा नृत्य महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवात भारतीय सांस्कृतिक आणि शास्त्रीय नृत्यांचे सादरीकरण केले जाते. देशवासीयांनी मोढेराला भेट देऊन या ऐतिहासिक वारशाचा अनुभव घ्यावा, असे आवाहनही मोदी यांनी केले.

सर्जिकल स्ट्राईक, अशोक सिंघल यांची आठवण...

मोदी यांनी सर्जिकल स्ट्राइकला दहा वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख करत दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिकेवरही भाष्य केले. तसेच जनगणना, अशोक सिंघल यांची जन्मशताब्दी, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, नशामुक्ती अभियान, क्रीडा प्रतिभा शोध, ‘एक जिल्हा एक उत्पादन’ आणि पोषण अभियान अशा विविध विषयांवर त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला. जनगणनेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असेही आवाहन मोदींनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news