Reel Shooting Video: रील बनवताना झाली चूक; तरुणाने स्वतःवरच झाडली गोळी, सोशल मीडियावर खळबळ

Delhi Reel Shooting Video: दिल्लीत रील बनवताना एका तरुणाचा चुकून गोळी लागून मृत्यू झाला. लायसेंसी पिस्तूलसह स्टंट करताना ट्रिगर दाबल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे सोशल मीडिया खळबळ उडाली आहे.
Reel Shooting Video
Reel Shooting VideoPudhari
Published on
Updated on

Delhi Reel Shooting Video: दिल्लीतील दल्लूपुरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावर रील बनवण्याच्या नादात एका तरुणाने चुकून स्वतःवरच गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पवन असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 16 मार्च 2026 रोजी घडली आहे. न्यू अशोक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या धर्मशिला रुग्णालयातून एका तरुणाला गोळी लागल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा पवन कुमार या तरुणाच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

रील बनवताना घडली दुर्घटना

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पवन आपल्या चुलत भावासोबत व्हिडिओ शूट करत होता. त्याच्या चुलत भावाकडे परवानाधारक पिस्तूल होते. दोघेही त्या पिस्तूलसोबत स्टंट करत रील बनवत होते. या दरम्यान पवनने पिस्तूलमध्ये मॅगझीन टाकून ते स्वतःच्या छातीवर धरले आणि अचानक ट्रिगर दाबला गेला. गोळी थेट त्याच्या हृदयात गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी पिस्तूल केले जप्त

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले. एक परवानाधारक पिस्तूल, 10 गोळ्या आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. त्या मोबाईलमध्ये संपूर्ण घटनेचा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे.

Reel Shooting Video
LPG eKYC Rule: सरसकट सर्व गॅसधारकांना ईकेवायसी बंधनकारक आहे का? सरकारचं स्पष्टीकरण

गुन्हा दाखल; तपास सुरू

या प्रकरणात न्यू अशोक नगर पोलीस ठाण्यात BNS कलम 105 (हे कलम सदोष मनुष्यवधाच्या शिक्षेशी संबंधित आहे जे खुनाच्या व्याख्येत येत नाही) तसेच आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवनचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी एलबीएस रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. रील्सच्या नादात जीवाशी खेळण्याचे प्रकार वाढत असून अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news