Jalgaon ex corporator video: पोलीस ठाणे की कुस्तीचा आखाडा? जळगावात भाजपच्या माजी नगरसेवक- मोगलीबाबा गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

महानगरपालिका निवडणूक आणि ठेक्यांच्या वादातून मारहाण, तीन जण जखमी, शस्त्रे जप्त
Jalgaon Municipal Contracts Dispute
भाजपच्या माजी नगरसेवकासह त्यांच्या समर्थकांना पोलिसांसमोरच दुसऱ्या गटाने बेदम मारहाण केली. Pudhari
Published on
Updated on

Jalgaon Municipal Contracts Dispute

जळगाव : जळगाव शहरातील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या शनिपेठ पोलीस ठाण्यात कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित करणारी थरारक घटना घडली आहे. तक्रार देण्यासाठी आलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकासह त्यांच्या समर्थकांना पोलिसांसमोरच दुसऱ्या गटाने बेदम मारहाण केली. या राड्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारातच 'कुस्तीचा आखाडा' भरला होता. माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि राहुल ठाकरे उर्फ मोगली बाबा यांच्या गटात महानगरपालिकेच्या निवडणुका आणि ठेक्यांच्या वादातून हा मारहाण झाली . यामध्ये तीन जण जखमी झालेले असून काही शस्त्र ही जप्त करण्यात आलेली आहे

वाल्मिक नगरातील वादाची ठिणगी पोलीस ठाण्यात पेटली

वाल्मिक नगरात भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांचा आणि तरुणांच्या एका गटाचा किरकोळ वाद झाला होता. या वादाची तक्रार देण्यासाठी दोन्ही गट शनिपेठ पोलीस ठाण्यात पोहोचले होते. पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर आणि इतर कर्मचारी तक्रार नोंदवून घेत असतानाच, राहुल ठाकरे उर्फ मोगली बाबा हा आपल्या साथीदारांसह पोलीस ठाण्यात घुसला. त्यांनी काहीही विचार न करता थेट कैलास सोनवणे आणि त्यांच्या दोन साथीदारांवर हल्ला चढवला.

Jalgaon Municipal Contracts Dispute
Jalgaon Crime | पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा राग: तरुणाचा खून करून मृतदेहाची लावली विल्हेवाट

पोलिसांच्या नाकाखालीच फ्री-स्टाईल हाणामारी

पोलीस ठाण्याच्या आतच दोन्ही गट एकमेकांना भिडल्याने प्रचंड गोंधळ उडाला. सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांनीही प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस ठाण्यात 'फ्री-स्टाईल' हाणामारी सुरू झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर करत दोन्ही बाजूंना पांगवले. सुरक्षेच्या कारणास्तव कैलास सोनवणे यांना तात्काळ पोलीस वाहनातून सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.

निवडणुकीची 'खुन्नस' आणि ठेक्यांचा वाद

या भीषण वादाला राजकीय आणि व्यावसायिक संघर्षाची मोठी किनार आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या निवडणुकीत कैलास सोनवणे यांची मुलगी आणि राहुल ठाकरे उर्फ मोगली बाबा याची पत्नी एकमेकींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होत्या. तेव्हापासून या दोन गटांत तीव्र राजकीय वैमनस्य आहे. त्यातच महानगरपालिकेच्या ठेक्यावरूनही त्यांच्यात वाद सुरू असल्याची चर्चा आहे.

Jalgaon Municipal Contracts Dispute
Jalgaon News | २०२६ मध्ये काढला आदेश, चौकशी २०२५ मध्ये; जळगाव तहसीलच्या 'अजब' पत्राने जिल्हाधिकारी चक्रावले

एसपींची धाव; छावणीचे स्वरूप

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेनंतर शहरात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस ठाणे आणि वाल्मिक नगर परिसरात राज्य राखीव पोलीस दलाचा (SRPF) मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भर पोलीस ठाण्यात लोकप्रतिनिधीवर झालेला हा हल्ला जळगावच्या गुन्हेगारीचे वाढते धाडस दर्शवणारा असून, पोलीस आता या 'भाई'गिरीवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news