

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. शर्मा यांनी याबाबतची दिल्ली पोलिसांत तक्रार केली. यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर नुपूर शर्मा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. अनेक लोकांनी सोशल मीडियावरून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे नुपूर यांनी दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफआयआरच्या आधारे या धमक्याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. प्रेषित मोहम्मद यांच्यावरील कथित वादग्रस्त विधान केल्याने भाजपने रविवारी नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले आहे. मात्र, नूपुरने आपल्या वक्तव्यावर माफी ही मागितली आहे.
दरम्यान, नुपूर शर्माने तक्रारीमध्ये म्हटले की, मला आणि माझ्या कुटुंबाला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तसेच काही छायाचित्रे मी जोडत आहे. कृपया याची दखल घेण्यात यावी. एवढेच नाही तर पुन्हा ट्विट करून त्याने आपल्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण केला आहे. असे त्यांनी सांगितले.
तसेच सर्व प्रसारमाध्यमे आणि इतरांनी माझा पत्ता सार्वजनिक करू नका. माझ्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात आहे, असे शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते.
हेही वाचा