सक्‍ती नसली तरी नागरिकांनी मास्‍क वापरणे आवश्‍यक : आरोग्‍यमंत्री टोप | पुढारी

सक्‍ती नसली तरी नागरिकांनी मास्‍क वापरणे आवश्‍यक : आरोग्‍यमंत्री टोप

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

राज्‍यातील सहा जिल्‍ह्यांमध्‍ये कोरोना रुग्‍णसंख्‍या वाढत आहे. याबाबत मुख्‍यमंत्री उद्‍धव ठाकरे यांनी संपूर्ण माहिती दिली आहे. राज्‍यात मास्‍कची सक्‍ती नसली तरी नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक उपाय म्‍हणून मास्‍कचा वापर करावाच, असे आवाहन आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांनी आज  केले.

माध्‍यमांशी बाेलताना टाेपे म्‍हणाले, सहा जिल्‍ह्यांमध्‍ये पॉझिटिव्‍हीटी रेट वाढला आहे. येथील चाचण्‍या वाढविण्‍यात आल्‍या आहेत. सर्वांनीच काळजी घेण्‍याची गरज आहे.

काही जिल्‍ह्यांमध्‍ये कोरोना रुग्‍णांची संख्‍या वाढत आहे. त्‍यामुळे आजच्‍या बैठकीत रुग्‍णालयात बेड वाढवण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. रुग्‍णसंख्‍या वाढत असली तरी रुग्‍णालयात दाखल होण्‍याचे प्रमाण ४ टक्‍के असल्‍याने काळजी करण्‍याचे कारण नाही, असेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button