कल्याण : मित्रानेच केली मित्राची हत्या; पाेलिसांनी २४ तासात आरोपीला ठोकल्या बेड्या | पुढारी

कल्याण : मित्रानेच केली मित्राची हत्या; पाेलिसांनी २४ तासात आरोपीला ठोकल्या बेड्या

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा: कल्याण पश्चिमेकडील पडीक इमारतीमध्ये एका तरुणाची एका इसमाने हत्या केल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी घेत तपास करत अवघ्या २४ तासात आरोपीला गजाआड केले. थापा असे या मयत तरुणाचे नाव असून शेरबहादुर धामी (दोघेही मूळचे नेपाळी) असे आरोपीचे नाव आहेत.

याबबात अधिक माहिती अशी की, धामी कल्याणमध्ये बिगारचे काम करतो. तर थापा हा चायनीज कुक होता. हे दोघे मित्र होते. त्यांना राहण्यासाठी घर नसल्याने त्यांनी पडीक इमारतीचा आसरा घेतला होता. थापा हा कायम या ठिकाणी महिलांना घेवून येत होता. महिलांना येथे आणू नकोस, असे सांगत धामीने त्‍याला विरोध करत असे.  थापा ऐकत नव्हता. त्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून धामी याने डोक्यावर दगड मारून थापाची हत्या केली.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली होती. महात्मा फुले पोलिस ठाण्याचे क्राईम पीआय प्रदीप पाटील यांच्या पथकाने  अवघ्या २४ तासात आरोपीला गजाआड  केले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी ली.

हेही वाचलंत का? 

Back to top button