Delhi Police Crack Down: आंदोलन संपलं आता दिल्ली पोलीस पोलिसांनी सुरू केली विशेष मोहीम... 'सोशल' साफसफाई केली सुरू

Delhi Police Crack Down
Delhi Police Crack Downpudhari
Published on
Updated on

delhi police crackdown special social media cleanup: दिल्लीतील जंतर मंतरवर जवळपास दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलन आता संपुष्टात आलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, सरकार आणि आंदोलकांमध्ये झालेल्या यशस्वी वाटाघाटी यामुळं देशातील आंदोलक जेन झी आपापल्या घरी गेले आहेत. आता जंतर मंतरवरील भिंतीवर करण्यात आलेली सृजनशीलता आता कर्मचारी साफ करत आहे. तर दिल्ली पोलिसांनी देखील एक विशेष क्रॅक डाऊन मोहीम उघडली आहे. ही मोहीम सोशल मीडियावर असणार आहे.

Delhi Police Crack Down
CJP protest: जनक्षोभाचा उद्रेक अन् राजकीय परीक्षा! मोदी सरकारबद्दल जगातील 'या' ६ मोठ्या वृत्तवाहिन्यांनी काय म्हटले?

दिल्ली पोलिसांनी कॉक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनावेळी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध जी सोशल मीडिया मोहीम राबवली होती. त्यातील भडकाऊ आणि आक्षेपार्ह भाषेतील सर्व पोस्ट सोशल मीडियावरून हटवण्याची मोहीम सुरू केली आहे.

Delhi Police Crack Down
CJP withdraws protest : सर्व मागण्‍या मान्‍य; कॉकरोज जनता पार्टीचे जंतर मंतरवरील आंदोलन तत्‍काळ प्रभावाने मागे

दिल्ली पोलीसांनी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना याबाबत नोटीस बजावली आहे. अनेक फ्लॅग करण्यात आलेले व्हिडिओ आणि पोस्ट सोशल मीडियावरून काढून टाकण्याचे काम सुरू केले आहे. पोलिसांच्या टीमने ते कंटेट सातत्याने चेक करत आहेत. नवीन काही मटेरियल सोशल मीडियावर आल्यावर ते नवीन नोटीस बजावत आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना त्वरित कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.

Delhi Police Crack Down
Delhi High Court On Police Force: आम्हाला यात ओढू नका... दिल्ली उच्च न्यायालयाने हात झटकले, 'बळाचा' वापर प्रकरणी त्वरित सुनावणी नाहीच

ही मोहीम आंदोलन संपल्यानंतर काही दिवसांनी सुरू करण्यात आली आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर हे आंदोलन संपलं होतं. जवळपास दीड महिना सुरू असलेल्या या आंदोलनानंतर सरकारने आंदोलकांच्या तीनही मागण्या मान्य केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news