गुप्तचर यंत्रणेचा एजंट असल्याचे सांगून विदेशी नागरिकांची लूट करणाऱ्या इराण्यास अटक

गुप्तचर यंत्रणेचा एजंट असल्याचे सांगून विदेशी नागरिकांची लूट करणाऱ्या इराण्यास अटक

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : गुप्तचर यंत्रणेचा एजंट असल्याचे सांगून विदेशी लोकांना लुटणाऱ्या इराणी व्यक्तीस दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तुमच्या बॅगेत अंमली पदार्थ आहेत, असे सांगत हुसेन रजाफार्ड अहमद नावाचा इराणी गुन्हेगार विदेशी नागरिकांच्या बॅगा तपासायचा. यानंतर तो लूटमार करून पळून जायचा, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

गेल्या २१ मे रोजी दिल्लीत आलेल्या अहमदने लाजपतनगर भागात खोली घेतली होती. दोन स्थानिक लोकांशी मैत्री करत त्याने वैद्यकीय व्हिसावर भारतात आलेल्या लोकांना आपले सावज बनविले होते. हॉस्पिटल परिसरात सावज भेटले की, परदेशातून येताना तुम्ही अंमली पदार्थ आणले आहे. त्यामुळे बॅगेची झडती घ्यायची आहे, असे तो सांगत असे. बॅग तपासत असताना हातचलाखी करून विदेशी लोकांच्या मौल्यवान वस्तू व पैशाची तो लूटमार करीत असे. लाजपतनगर भागात त्याच्याविरोधात एका विदेशी नागरिकाने गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी तपास चालू केला होता. अहमदचे दोन साथीदार मात्र अद्याप पोलिसांच्या जाळ्यात आलेले नाहीत.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news