Crime News : राजधानी हादरली! मुसळधार पाऊस...अंधार अन् बंद पडदे; धावत्या ट्रॅव्हल्समध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्‍याचार

पोलिसांनी दोघा आरोपींना ठोकल्या बेड्या
Delhi Minor Assault Moving Bus
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

Delhi Minor Assault Moving Bus

चुकीच्या थांब्यावर उतरल्यामुळे मुसळधार पाऊस आणि अंधारात अडकलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला मदतीचा बहाणा करून धावत्या स्लीपर बसमध्ये ओढून तिच्यावर सामूहिक अत्‍याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेला तब्बल ४७ किलोमीटर फिरवून कश्मीरी गेट परिसरात सोडून आरोपी पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी चालक आणि वाहकाला अटक केली आहे.

कौटुंबिक वादातून मुलीचे सोडले होते घर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश राज्‍यातील 16 वर्षीय मुलगी ५ ऑगस्ट रोजी कौटुंबिक वादातून घर सोडून नोएडामध्ये राहणाऱ्या तिच्या चुलत भावाला भेटण्यासाठी निघाली होती.

मुसळधार पावसात चुकीचा थांबा

रात्रीच्या वेळी मुसळधार पाऊस आणि सर्वत्र अंधार असताना पीडित मुलगी चुकीने 'परी चौक' येथे उतरली. मदतीची गरज असल्याने तिने रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिकाम्या स्लीपर ट्रॅव्हल्सला हात दाखवून थांबवले. गाडीचा चालक कुलदीप आणि वाहक संदीप यांनी ही बस नोएडा सेक्टर ६३ कडे जात असल्याचे सांगून तिला बस बसवून घेतले.

Delhi Minor Assault Moving Bus
Crime News : गळा चिरलेला अन् शेवटचा श्वास... मृत्यूच्या दाढेतून महिलेने कागदावर रक्ताने लिहिले मारेकऱ्याचे नाव!

बसमधील पडद्यांच्या आडोशाने अत्याचार

गाडी सुरू होताच वाहकाने मुलीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. पीडितेने तीव्र विरोध केला असता आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. चालक-वाहक या दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. स्लीपर बसच्या बर्थला पडदे असल्याने गाडीत चाललेला हा प्रकार बाहेरून कोणाच्याही लक्षात आला नाही.

पीडितेला कश्मीरी गेटजवळ फेकून नराधम पसार

आरोपींनी बस कश्मीरी गेटच्या दिशेने जवळपास ४७ किलोमीटर पळवली. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी पीडितेला कश्मीरी गेट बस टर्मिनसजवळील रिंग रोडवर रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि तेथून पळ काढला.

Delhi Minor Assault Moving Bus
Crime News: वहिनीसोबत होतं अफेअर... पत्नीनं विरोध केला, पतीने गळा कापून बेडखाली लपवला मृतदेह

पोलिसांची तत्परता, आरोपी अटकेत

या भयानक प्रसंगातून सावरल्यानंतर घाबरलेल्या पीडितेने थेट कश्मीरी गेट पोलीस ठाणे गाठले. येथील अधिकार्‍यांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत तिमारपूर येथील बस पार्किंगमधून चालक कुलदीप आणि वाहक संदीप या दोघांना बेड्या ठोकल्या. गुन्हा घडलेली स्लीपर बस जप्त करण्यात आली असून ती फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आली आहे.

Delhi Minor Assault Moving Bus
Crime News: एकतर्फी प्रेम... दीड वर्षांपासून पाठलाग अन् शेवट भयानक; २१ वर्षांच्या मॉडेलसोबत तिच्याच घरात नेमकं काय घडलं?

बस दुरुस्तीनंतर परतताना रचला कट

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही स्लीपर बस खराब झाल्यामुळे सूरजपूर येथील वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी नेण्यात आली होती. काम पूर्ण झाल्यानंतर आरोपी चालक आणि वाहक रिकामी बस घेऊन तिमारपूरकडे जात असतानाच परी चौक येथे ही मुलगी त्यांना आढळली आणि आरोपींनी हे भयंकर कृत्‍य केल्‍याचे प्राथमिक पोलीस तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news