Crime News: वहिनीसोबत होतं अफेअर... पत्नीनं विरोध केला, पतीने गळा कापून बेडखाली लपवला मृतदेह

Crime News
Crime Newspudhari
Published on
Updated on

Crime News: पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मालदा येथील इंग्लिश बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्तारी भागात एका पतीने आपल्या अनैतिक संबंधात आड येणाऱ्या पत्नीला अत्यंत निर्दयीपणे संपवलं. गुन्हा केल्यानंतर पतीने पुरावे लपवण्यासाठी पत्नीचा मृतदेह एका खोलीतील बेडखाली लपवला होता. मात्र पोलिसांनी त्वरित कारवाई करत प्रमुख आरोपी पती आणि त्याची प्रमिका भाभी या दोघांनाही अटक केली आहे.

Crime News
Thane Crime News: खुनाच्या गुन्ह्यातील अट्टल गुंडास राजस्थानातून अटक

मृत महिलेची ओळख पटली असून तिचे नाव शीला बीबी आहे. ती २५ वर्षाची आहे. तिचे लग्न मोजम्मेल नावाच्या युवकाशी झाले होते. मोजम्मेल हा एक कामगार असून तो दुसऱ्या राज्यात जाऊन काम करत होता. दोघांनाही दोन छोटी मुलं देखील आहे.

Crime News
Nahsik Crime News | गणपती वर्गणीचा वाद ठरला प्राणघातक! सुरगाण्यातील 29 वर्षीय तरुणाची सापुताऱ्यात हत्या

पोलीस आणि स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून मोजम्मेलचे आपल्या कुटुंबातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध सुरू होते. ही महिला त्याला नात्याने वहिनी लागत होती. ज्यावेळी याची शंका शीला बीबीला आली त्यावेळी ती रोज त्याच्यासोबत घरात भांडण काढत होती. शीला या अनैतिक संबंधाला विरोध करत होती. ज्या दिवशी शीलाचा खून झाला त्या दिवशी देखील मोजम्मेलसोबत शीलाचा वाद झाला होता. रागात मोजम्मेलने धारदार शस्त्रानं शीलाचा गळा कापला. त्यामुळं तिचा जागीच मृत्यू झाला.

Crime News
Crime News: ‘भूतबाधा’ झाल्याचे सांगून पुजाऱ्याचा महिलेवर लैंगिक अत्याचार

पत्नीची हत्या केल्यानंतर मोजम्मेलने हुशारी दाखवत पत्नीचा मृतदेह एका खोलीतील बेडच्या खाली लपवला. मात्र घराच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना संशयास्पद हालचाली दिसल्यामुळं त्यांनी घराची तपासणी केली. त्यावेळी पलंगाखाली शीलाचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी लगेच पोलीस ठाण्यात कळवलं. पोलीस आल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आला.

पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत मुख्या आरोपी मोजम्मेल सोबत त्याची प्रेमिका या दोघांना देखील हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली अटकी केली. पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news