Delhi Judge Death: पत्नी आणि मेहुणीकडून छळ, रडत वडिलांना फोन करून बोलावले अन्...; तरुण न्यायाधीशाने जीवन संपवले

पत्नीकडून होणारा छळ आणि सततच्या कौटुंबिक वादाला कंटाळून एका ३० वर्षीय न्यायाधीशाने शनिवारी सफदरजंग परिसरातील आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवले.
Delhi Judge Death
Delhi Judge Deathfile photo
Published on
Updated on

Delhi Judge Death:

नवी दिल्ली: दिल्लीतील कडकडडूमा न्यायालयात कार्यरत असलेल्या एका ३० वर्षीय न्यायाधीशाने शनिवारी सफदरजंग परिसरातील आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवले. पत्नीकडून होणारा छळ आणि सततच्या कौटुंबिक वादाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. अमन कुमार शर्मा असे न्यायाधीशांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन शर्मा ग्रीन पार्क मेन येथील आपल्या सदनिकेत मृतावस्थेत आढळले. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी खिडकी तोडून आत प्रवेश केला. दुपारी दीडच्या सुमारास त्यांना तातडीने सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे.

Delhi Judge Death
Crime News | धक्‍कादायक! डाएटिशियन पत्नीची हत्या करून मृतदेह सिमेंटच्या क्रेटमध्ये लपवला!

वडिलांना फोन केला अन्...

शर्मा यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये टोकाचे मतभेद होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, न्यायाधीशांनी शुक्रवारी अलवर येथील आपल्या वडिलांना फोन करून तातडीने दिल्लीला बोलावून घेतले होते. मुलाचा फोन आल्यानंतर वडील शुक्रवारीच दिल्लीत पोहोचले होते.

मृत्यूपूर्वी घरात मोठा वाद

वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री घरात मोठा वाद सुरू होता. अमन एका खोलीत होते तर त्यांची पत्नी दुसऱ्या खोलीत. "पत्नी जोरात ओरडत होती आणि अमन रडत होते," असे नातेवाईकांनी सांगितले. बराच वेळ अमन दिसले नसल्याने त्यांच्या फोनवर कॉल केला असता, बाथरूममधून रिंग वाजली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला.

पत्नी आणि मेहुणीकडून त्रास

नातेवाईकांनी आणखी गंभीर आरोप केले आहेत. अमन शर्मा यांची पत्नी आणि जम्मू-काश्मीरमध्ये सनदी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या त्यांच्या मेहुणीकडून त्यांना त्रास दिला जात होता, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

घटनेच्या आदल्या रात्री १० च्या सुमारास अमन यांनी वडिलांना फोन करून "मी खूप संकटात आहे, मला जगणे कठीण झाले आहे," असे रडत सांगितले होते. घरात पत्नीचेच चालते, माझा मानसिक छळ केला जात आहे, असे अमन यांनी वडिलांना सांगितले होते. त्यानंतर वडिलांनी या वादात मध्यस्थी करण्यासाठी पत्नीच्या माहेरच्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे नंबर ब्लॉक करण्यात आले होते.

पुण्यात घेतली होती कायद्याची पदवी

अमन कुमार शर्मा यांनी २०१८ मध्ये पुण्यातील सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली होती. १९ जून २०२१ रोजी ते दिल्ली न्यायिक सेवेत रुजू झाले. गुन्हेगारी आणि दिवाणी अशा दोन्ही प्रकरणांत त्यांनी काम केले होते. ऑक्टोबर २०२५ पासून ते कडकडडूमा न्यायालयात आपली सेवा बजावत होते.

Delhi Judge Death
एसटीखाली चिरडून बाप-लेकाचा करूण अंत, पोलीस बंदोबस्तात निघाली अंत्‍ययात्रा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news