Sanjay Kapoor property dispute | 'मर्यादा राखा...' : दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या पत्नी आणि बहिणीला हायकोर्टाने झापले

एकमेकांविरुद्ध सार्वजनिक विधाने करण्यास मनाई, ३० हजार कोटींच्या संपत्तीवरून कपूर कुटुंबियांत कलह
Sanjay Kapoor property dispute
संजय कपूर यांची पत्नी प्रिया सचदेव कपूर आणि बहीण मंधिरा कपूर स्मिथ यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहून दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि. १७) तीव्र नाराजी व्यक्त केली.
Published on
Updated on

Sanjay Kapoor property dispute

नवी दिल्ली: दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या ३० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून सुरू असलेला कौटुंबिक वादावर न्‍यायालयात सुनावणी सुरु आहे. संजय कपूर यांची पत्नी प्रिया सचदेव कपूर आणि बहीण मंधिरा कपूर स्मिथ यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहून दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि. १७) तीव्र नाराजी व्यक्त केली. "दोन्ही पक्षांनी सन्मानाने वागावे आणि एकमेकांविरुद्ध जाहीर विधाने टाळावीत, अशी न्यायालयाची अपेक्षा आहे," अशा कडक शब्दांत न्यायालयाने त्‍यांना फटकारले.

दोघींमध्‍ये नेमका वाद काय?

न्यायमूर्ती मिनी पुष्कर्णा यांनी प्रिया कपूर यांनी केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी मंधिरा कपूर यांना नोटीस बजावली आहे. प्रिया कपूर यांनी आपल्या नणंदेविरुद्ध २० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. न्यायालयाने मंधिरा कपूर यांना उत्तर देण्यासाठी पाच आठवड्यांचा वेळ दिला असून, तोपर्यंत एकमेकींविरुद्ध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतेही विधान न करण्याचे आदेश दिले आहेत.

Sanjay Kapoor property dispute
Sanjay Kapoor property dispute | तीस हजार कोटींच्या संपत्तीचे बनावट मृत्युपत्र!

३० हजार कोटींचा वाद अन् 'खळबळजनक' आरोप

संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या ३०,००० कोटी रुपयांच्या साम्राज्यावर ताबा मिळवण्यासाठी कुटुंबात संघर्ष सुरू झाला आहे. यामध्ये महागडी कलाकुसर, दागिने आणि भारत, अमेरिका, चीन व मेक्सिकोमध्ये पसरलेल्या ऑटोमोटिव्ह बिझनेस साम्राज्याचा समावेश आहे.या वादात सासू राणी कपूर आणि सून प्रिया कपूर यांच्यातही कायदेशीर लढाई सुरू आहे. राणी कपूर यांचा दावा आहे की, त्या या सर्व संपत्तीच्या एकमेव वारस आहेत. प्रियाने फसवणूक करून फॅमिली ट्रस्टची कागदपत्रे स्वाक्षरी करून घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच संजय कपूर यांचा पगार ६० कोटी असताना त्यांच्याकडे केवळ १.७ कोटींची रोकड कशी? असा सवाल करत प्रियाने संपत्ती लपवल्याचा आरोप सासूने केला आहे. दुसरीकडे, प्रिया कपूर यांनी २०२५ मधील एका मृत्युपत्राचा (Will) दाखला दिला असून, त्यानुसार सर्व संपत्तीची मालकी त्यांच्याकडे असल्याचा दावा केला आहे.

Sanjay Kapoor property dispute
Sanjay Kapoor Property Row | करिश्मा कपूर-संजय कपूर घटस्फोटाची कागदपत्रे मिळावीत; प्रिया कपूर यांची सुप्रीम कोर्टात धाव

करिश्मा कपूरच्या मुलांचाही दावा

संजय कपूर यांची दुसरी पत्नी आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांची मुले कियान आणि समायरा यांनीही या वादात उडी घेतली आहे. प्रिया कपूर यांनी सादर केलेले मृत्युपत्र बनावट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रिया यांनी संपत्तीची पूर्ण यादी न्यायालयात दिली नसल्याचा आरोप मुलांनी केला आहे. यामध्ये पोलो खेळण्यासाठी वापरले जाणारे महागडे घोडे, ऑडेमर्स पिगुएट आणि रोलेक्स यांसारखी महागडी घड्याळे आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news