Daku Dulhan: 'डाकू दुल्हन'पासून सावधान! एक- दोन नव्हे तर तब्बल 12 तरुणांना घातलाय गंडा

Daku Dulhan Arrest | विविध नावं धारण करून 12 जणांशी लग्नं करत, त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे घेऊन पसार होणाऱ्या एका महिलेचा पर्दाफाश झाला आहे.
 Daku Dulhan Arrest
Daku Dulhan ArrestOnline Pudhari
Published on
Updated on

Daku Dulhan Arrest

लखनऊ : विविध नावं धारण करून 12 जणांशी लग्नं करत, त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे घेऊन पसार होणाऱ्या एका महिलेचा पर्दाफाश झाला आहे. 'डाकू दुल्हन' म्हणून ओळखली जाणारी गुलशाना रियाज खान (वय 21) हिला अंबेडकरनगर पोलिसांनी तिच्या टोळीतील आठ जणांसह अटक केली आहे.

 Daku Dulhan Arrest
Pahalgam Terrorist Attack: पहलगाम हल्ल्याबाबत NIAच्या प्राथमिक अहवालातून धक्कादायक खुलासा

गुलशाना ही गुजरातमध्ये 'काजल', हरियाणामध्ये 'सीमा', बिहारमध्ये 'नेहा' आणि उत्तर प्रदेशमध्ये 'स्वीटी' या वेगवेगळ्या नावांनी ओळखली जात होती. ती प्रत्येकवेळी लग्नाचे नाटक करून काही तासांत गायब होत असे. विवाह समारंभादरम्यान तिचे अपहरण होत असल्याचा बनाव केला जाई तसेच, तिच्यासोबतचे दागिने, रोख पैसे व इतर वस्तू गुप्तपणे लंपास केल्या जात होत्या .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी मुख्यतः अशा कुटुंबांना लक्ष्य करत असे ज्यांना योग्य जोडीदार मिळवण्यात अडचणी येत होत्या. विवाहापूर्वी काही "सेटलमेंट रक्कम" घेऊन लग्नाचे नाटक रचले जात असे, लग्न झाल्यावर पुरुष सदस्य "वधूचे" अपहरण करीत आणि मौल्यवान वस्तूंनी भरलेली ती गायब होत असे.

 Daku Dulhan Arrest
26/11 terrorist attack : दहशतवादी हाफिज सईदचे नेटवर्क अजूनही भारताविरुद्ध सक्रिय, NIA ने दिली माहिती

अंबेडकरनगर जिल्ह्यातील बासखरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कसाधा गावाजवळ पोलिसांनी ही टोळी रंगेहाथ पकडली. तपासादरम्यान पोलिसांनी ₹७२,००० रोख, एक मोटरसायकल, एक सोन्याच मंगळसूत्र, ११ मोबाईल फोन आणि ३ बनावट आधार कार्ड जप्त केली आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:

  • मोहनलाल (हरियाणा),

  • रतन कुमार सरोज (जौनपूर),

  • रंजन उर्फ आशू गौतम (जौनपूर),

  • राहुल राज (अंबेडकरनगर),

  • सन्नो उर्फ सुनीता,

  • पूनम,

  • मंजू माळी

  • रुखसार

 Daku Dulhan Arrest
India US defence deal | भारत खरेदी करणार अमेरिकेचे सागरी सुरक्षा सॉफ्टवेअर

या टोळीने सोनू नावाच्या हरियाणातील रोहतक येथील व्यक्तीकडून लग्नासाठी ₹८०,००० उकळले होते. लग्नाच्या दिवशीच नववधूचे अपहरण झाल्याची तक्रार सोनूने दिली आणि पोलिसांनी तत्काळ रस्ते सील करत एक आरोपीला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीतून संपूर्ण टोळी गजाआड करण्यात आली.

पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, फसवणूक करण्यासाठी कट रचणे आदी कलमांखाली गुन्हा नोंदवला असून, आणखी काही पीडितांची माहिती व इतर सहभागींचा तपास सुरु आहे.

, woman dupes grooms India, marriage fraud gang UP, Gulshana Riaz Khan scam, 12 grooms duped, fake weddings scam India, Ambedkar Nagar police arrest, UP marriage scam, wedding fraudster India, Indian bride conwoman

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news