

terrorist hafiz saeed network is still active against india NIA
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याची भारत सरकारने गंभीर दखल घेतली आहे. आता भारत सरकार ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. दहशतवाद्यांची सर्व माहिती गोळा केली जात आहे. त्यांचे धागेदोरे तपासले जात आहेत. या विषयी राष्ट्रीय तपास यंत्रणेने न्यायालयाला माहिती दिली की, हाफिज सईदशी जोडलेली दहशतवादी संघटना भारताविरूद्ध दहशतवादी कारवाया करण्यात अजुनही गुंतलेली आहे.
तहव्वुर राणाच्या डिमांडची मागणी करताना न्यायालायाला ही माहिती देण्यात आली. हाफिज सईद हा २६/११ दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड आहे. एनआयएने सांगितले की, राणाकडून चौकशीत काही माहिती मिळाली आहे. असे असूनही, मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि पुरावे तपासणे आवश्यक आहे.
आरोपीच्या आरोग्याची स्थिती पाहता, एजन्सीने यावर भर दिला की, चौकशी योग्य पद्धतीने केली जात आहे आणि बचाव पक्षाच्या दाव्यानुसार दिवसाचे २० तास नाही. तपासात राणाच्या सहकार्याच्या अभावाबद्दलही सरकारी वकिलांनी चिंता व्यक्त केली.
दरम्यान, न्यायालयात सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, केस डायरीचा आढावा घेतल्यावर असे दिसून येते की, एनआयए पूर्ण परिश्रमाने तपास करत आहे. बुधवारी विशेष एनआयए न्यायालयाने राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) २६/११ चा मास्टरमाइंड तहव्वुर राणा याच्या आवाजाचे आणि हस्ताक्षराचे नमुने मिळविण्याची परवानगी दिली.
२६/११ दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड तहुव्वर हुसेन राणा याचे प्रमुख नाव आहे. त्याला मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड डेविड कोलमन हेडलीचा जवळचा व्यक्ती मानण्यात येते. हेडली आणि राणा हे दोघेही शालेय जीवनापासूनचे मित्र आहेत. हेडलीने नंतर हे मान्य केले आहे की, तो लश्कर-ए-तैयबा आणि पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयसाठी काम करत होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेला होता.
पाकिस्तानमधून ट्रेनिंग घेउन आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य केले होते. या दरम्यान १६० हून अधिक लोक मारले गेले होते. तर २०० हून अधिक लोक जखमी झाले होते. सध्या तहुव्वर राणा हा एनआयएच्या ताब्यात आहे.