देशात १ हजार ८२९ कोरोनाग्रस्तांची भर ; ०.०४% सक्रिय कोरोनाबाधित

देशात १ हजार ८२९ कोरोनाग्रस्तांची भर ; ०.०४% सक्रिय कोरोनाबाधित

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा :
देशात मंगळवारी दिवसभरात १ हजार ८२९ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, ३३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान २ हजार ५४९ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७५% आणि दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.४२% नोंदवण्यात आला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ४ कोटी ३१ लाख २७ हजार १९९ पर्यंत पोहचली आहे. यातील ४ कोटी २५ लाख ८७ हजार २५९ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. तर, १५ हजार ६४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५ लाख २४ हजार २९३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९१ कोटी ६५ लाख ७७० डोस देण्यात आले आहेत. यातील १२ ते १४ वयोगटातील बालकांना ३ कोटी २१ लाख डोस देण्यात आले आहेत. तर, ३ कोटी १४ लाख ४२ हजार ६१० बूस्टर डोस लावण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ कोरोना लशींपैकी १७ कोटी १६ हजार ६८५ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.

देशात आतापर्यंत ८४ कोटी ४९ लाख २६ हजार ६०२ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ३४ हजार ९६२ तपासण्या मंगळवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
देशातील बूस्टर डोसची स्थिती

श्रेणी बूस्टर डोस

१) आरोग्य कर्मचारी – ५०,५१,५४५
२) फ्रंटलाईन वर्कर्स – ८२,४०,९२७
३) १८ ते ४४ वयोगट – ४,६७,६०५
४) ४५ ते ५९ वयोगट – १०,६०,६०३
५) ६० वर्षांहून अधिक – १,६६,२१,९३०

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news