LPG Cylinder Prices Today: खुशखबर! आजपासून LPG सिलिंडरचे दर १८३.५० रूपयांनी झाले कमी; जाणून घ्या कुठं किती आहे दर

LPG Cylinder Price
LPG Cylinder Pricefile photo
Published on
Updated on

LPG Cylinder Prices Today: आज १ जुलै २०२६ पासून व्यावसायिक वापरासाठीच्या १९ किलो वजनी गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल १८३.५० रूपयांची घट झाली आहे. त्यामुळं हॉटेल व्यावसायिक, धाबा आणि इतर उद्योगधंदे करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दर कपातीनंतर दिल्लीत १९ किलो व्यासायिक एलपीजी सिलिंडरचे दर हे २ हजार ९३० रूपये इतके असणार आहे. यापूर्वी १९ किलोच्या सिलिंडरसाठी ग्राहकांना ३ हजार ११३ रूपये द्यावे लागत होते.

LPG Cylinder Price
LPG Cylinder Price Hike: ग्राहकांना महागाईचा झटका! 19 किलो कमर्शियल सिलेंडर 42 रुपयांनी महाग; घरगुती गॅसचे भाव वाढले का?

पूर्व आशियामधील इराण युद्धामुळं आणि पुरवठ्यावरील आलेल्या ताणामुळं व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढल्या होत्या. या नव्या दर कपातीमुळं आता हॉटेल्स आणि धाब्यांच्या इनपूट कॉस्टमध्ये घट होईल. त्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. याचबरोबर सरकार हळूहळू गॅस सिलिंडर पुरठ्याबाबत अंमलात आणलेल्या कडक धोरणात देखील शिथीलचा आणत आहे. त्यामुळं सिलिंडरच्या उपलब्धता देखील सुलभ अन् जलद होण्याची शक्यता आहे.

LPG Cylinder Price
महागाईने जगावं की मरावं! एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news