महागाईने जगावं की मरावं! एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर

सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्यानंतर आता व्यापारी आणि हॉटेल चालकांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसला आहे.
LPG Crisis India
LPG Crisis IndiaPudhari
Published on
Updated on

नवी दिल्ली: सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्यानंतर आता व्यापारी आणि हॉटेल चालकांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसला आहे. तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे.

सुधारित दरांनुसार, दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर तब्बल ४२ रुपयांनी महागला असून तो आता ३,११३.५० रुपयांवर पोहोचला आहे. तर कोलकात्यात सर्वाधिक ५३.५० रुपयांची वाढ झाल्याने तेथील दर ३,२५५.५० रुपयांवर गेले आहेत. हे नवे दर १ जूनपासून लागू झाले असून, यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा चालक आणि इतर व्यावसायिक ग्राहकांवर आर्थिक बोजा वाढणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे, घरगुती वापराच्या (१४.२ किलो) सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

LPG Crisis India
Petrol Diesel Price Hike | खिशाला 'पेट्रोल'ची आग; डिझेलच्या धुराने बळीराजाचीही कोंडी

महानगरांमध्ये संमिश्र दरवाढ; व्यावसायिक अडचणीत

१९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात विविध महानगरांमध्ये वेगवेगळी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत ग्राहकांना प्रति सिलिंडर ४२ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत, तर कोलकात्यातील व्यापाऱ्यांवर ५३.५० रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. या दरवाढीमुळे दोन्ही शहरांमध्ये कमर्शियल एलपीजीच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. आधीच इंधन आणि वाहतूक खर्चाच्या वाढत्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांना या नवीन दरवाढीमुळे दुहेरी फटका बसणार आहे.

छोटा सिलिंडरही महागला

व्यावसायिक सिलिंडरसोबतच तेल कंपन्यांनी छोटे व्यापारी आणि सर्वसामान्यांकडून वापरल्या जाणाऱ्या ५ किलोच्या एफटीएल सिलिंडरच्या किमतीतही ११ रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर दिल्लीत हा छोटा सिलिंडर ८२१.५० रुपयांना मिळणार आहे. या संपूर्ण दरवाढीत एकमेव दिलासा म्हणजे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत.

जानेवारीपासून किमतींमध्ये सातत्याने वाढ

२०२६ च्या अगदी सुरुवातीपासूनच व्यावसायिक सिलिंडर्सच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दिल्लीमध्ये, जानेवारी महिन्यात १९-किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १,६९१.५० रुपये इतकी होती. त्यानंतर, फेब्रुवारीमध्ये ४९ रुपये, मार्चमध्ये ११५ रुपये, एप्रिलमध्ये १९५.५० रुपये आणि मे महिन्यात तर चक्क ९९३ रुपये प्रति सिलिंडर अशी मोठी दरवाढ करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांत किमतींमध्ये वारंवार केलेल्या बदलांनंतर, दिल्लीमध्ये आता एका व्यावसायिक सिलिंडरची किंमत ३,११३.५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

LPG Crisis India
Fuel Price Hike: महागाईचा डबल झटका! इंधनानंतर आता दूध, तेल, भाज्या, डाळींसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news