Cockroach Janta Party: ९४% फॉलोअर्स भारतीयच, भाजपच्या आरोपावर 'कॉकरोच जनता पार्टी'च्या संस्थापकाचे प्रत्युत्तर

सोशल मीडियावरील आपल्या फॉलोअर्सपैकी निम्मे फॉलोअर्स हे पाकिस्तानमधील असल्याचा भाजप नेत्यांचा दावा 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे.
Cockroach Janta Party
Cockroach Janta PartyFile Photo
Published on
Updated on

Cockroach Janta Party

नवी दिल्ली: सोशल मीडियावरील आपल्या फॉलोअर्सपैकी निम्मे फॉलोअर्स हे पाकिस्तानमधील असल्याचा भाजप नेत्यांचा दावा 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शनिवारी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. तरुणांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या आणि सध्या राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या या डिजिटल चळवळीचे ९४ टक्क्यांहून अधिक फॉलोअर्स भारतीयच असल्याचा दावा दिपके यांनी केला आहे. बेरोजगारी, शैक्षणिक धोरण आणि कथित पेपरफुटी यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर मीम्स आणि उपरोधिक भाष्यांद्वारे या प्लॅटफॉर्मने इंटरनेटवर मोठी खळबळ उडवून दिली आहे.

भाजपचे आरोप खोडून काढताना अभिजीत दिपके यांनी 'एक्स' वर त्यांच्या अकाउंटच्या ॲनालिटिक्सचा एक स्क्रीनशॉट शेअर केला. "आमचे अकाउंट हॅक होण्यापूर्वी आम्ही मीडियासोबत शेअर केलेल्या ऑडियन्स डेमोग्राफिक्सचे हे स्क्रीन रेकॉर्डिंग आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना दिपके यांनी थेट प्रश्न केला की, "आमचे ९४ टक्क्यांहून अधिक फॉलोअर्स भारतातीलच आहेत. मग असे असताना केंद्रीय मंत्री किरण रिजिजू देशातील तरुणांना पाकिस्तानी असे का म्हणत आहेत?"

Cockroach Janta Party
who is Founder Of CJP: 'गंमत मधी' काढलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' चे आहे छत्रपती संभाजी नगर कनेक्शन; कोण आहे अभिजीत दीपके?

मंत्री किरण रिजिजू काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी 'कॉकरोच जनता पार्टी'वर कडाडून टीका केली होती. त्यांनी 'एक्स' वर लिहिले होते की, "सोशल मीडियावरील आपले फॉलोअर्स पाकिस्तान आणि जॉर्ज सोरोस गँगमध्ये शोधणाऱ्यांची मला दया येते."

दुसरीकडे, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री सुकांत मुजुमदार यांनीही या प्लॅटफॉर्मला मिळणारा प्रतिसाद हा पाकिस्तानमधून असल्याचा दावा केला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडियावरील ४९ टक्के फॉलोअर्स पाकिस्तानमधील आहेत, तर केवळ ९ टक्के फॉलोअर्स भारताचे आहेत."

भारताला अस्थिर करण्याचा परकीय कट: राजीव चंद्रशेखर

केरळ भाजपचे अध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. 'कॉकरोच जनता पार्टी' ही भारताला अस्थिर करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला लक्ष्य करण्यासाठी चालवली जाणारी एक 'क्रॉस-बॉर्डर इन्फ्लुएन्स ऑपरेशन' असल्याचा दावा त्यांनी केला.

Cockroach Janta Party
Abhijeet Deepke | ‘कॉक्रोच पार्टी’चे संस्थापक दीपकेंनाठार मारण्याच्या धमक्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news