CJP Vs Delhi Police: नंतर म्हणायला नको कळवलं नाही... परवानगी नाकारताच CJP चे थेट पोलिसांना आव्हान

सरकारविरोधी आंदोलन करण्यासाठी सरकारची परवानगी कशाला घ्यायची...
CJP Vs Delhi Police
CJP Vs Delhi Policepudhari
Published on: 
Updated on: 

CJP Vs Delhi Police Jantar Mantar: कॉकरोच जनता पार्टीचे सह संयोजक सौरव दासने बुधवारी पत्रकार परिषद घेत थेट दिल्ली पोलीसांनाच आव्हान दिलं. आज दिल्ली दासने दिल्ली पोलिसांना १० ऑक्टोबरच्या जंतर मंतरवरील प्रस्तावित प्रदर्शनाची औपचारिक सूचना दिली. कॉकरोज जनता पार्टी ही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मात्र दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी देण्यास नकार दिला.

CJP Vs Delhi Police
Notice to CJP : आंदोलनात सहभागी न होण्याबाबत सीजेपी कार्यकर्त्यांना नोटीस; दीपके यांची नाराजी

कळवलं नाही असं म्हणायला नको

यानंतर सौरव दासने संसद मार्ग पोलीस ठाण्यात पत्र देऊन पोलीसांना त्यांच्या आंदोलनाबाबतची माहिती दिली. दासने सांगितलं की आमच्या पक्षाने अधिकृतरित्या पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे. नंतर वाद नको म्हणून आम्ही हे केलं आहे. नंतर पोलिसांना कळवण्यात आले होते की नाही यावरून वाद नको. दासने सांगितलं की आंदोलनावेळी सीजेपी पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करणार आहे. दिल्ली पोलिसांकडून देखील सहकार्याची अपेक्षा आहे.

CJP Vs Delhi Police
CJP Protests : दडपशाहीने आंदोलन थांबणार नाही; शनिवारी देशव्यापी एल्गार : कॉक्रोच जनता पार्टीचा सरकारला इशारा

आंदोलनासाटी पोलीसांची परवानगी कशासाठी?

पोलिसांकडून सीजेपीच्या या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्यावर सौरव दासने जंतर मंतर सारख्या ठरवलेल्या आंदोलन स्थळावर आंदोलन करण्यासाठी पोलिसांच्या परवानगीची गरज कशाला असा प्रश्न विचारला. पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना आंदोलन करण्याच्या परवानग्या देण्यापेक्षा त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावीस. कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवावी, ट्रॅफिक नियंत्रण करावं. दास म्हणाला की, जंतर मंतर एक आंदोलन स्थळ आहे. ती ऐतिहासिक जागा आहे. तिथं शांतीपूर्ण आंदोलन होतात.

CJP Vs Delhi Police
CJP Protest : दीपकेंच्या सीजेपीला एक चूक महागात? मुंबई पोलिसांनी ५०० आंदोलकांवर दाखल केले गुन्हे

कधी झाली दिल्लीतील आंदोलनाची घोषणा?

दासने मुख्य निवडणूक आयुक्तांवर देखील निशाणा साधला. तो म्हणाला, १० ऑक्टोबरच्या दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाची घोषणा अभिजीत दिपकेने मुंबईच्या शिवाजी पार्कवरून २ ऑक्टोबर रोजी पक्षाच्या आंदोलनावेळी केली होती. जर ज्ञानेश कुमार हे आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत तर सीजेपी दिल्लीत येऊन जंतर मंतरवर आंदोलन करणार. सीजेपीने एआयआर प्रक्रियेत कथित घोटाळ्यावरून विरोध केला आहे. त्यासाठीत त्यांनी ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागितला आहे.

logo
Pudhari News
pudhari.news