CJP Protests : दडपशाहीने आंदोलन थांबणार नाही; शनिवारी देशव्यापी एल्गार : कॉक्रोच जनता पार्टीचा सरकारला इशारा

गृहमंत्री अमित शहा यांना उद्देशून दीपके यांनी सोशल मीडियावर लिहिले, किती जणांना अटक करणार? १० ऑक्टोबरला संपूर्ण देश रस्त्यावर उतरत आहे.
Cockroach Janta Party protest
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : सरकारी कारवाई आणि संभाव्य अटकेच्या भीतीने तरुणांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन थांबणार नाही, असा ठाम निर्धार कॉक्रोच जनता पार्टीने व्यक्त केला आहे. ‘एसआयआर’ प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत झालेल्या निदर्शनांनंतर पोलिसांनी सुमारे ११० जणांना ताब्यात घेतले होते. या पार्श्वभूमीवर पक्षाने देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सोमवारी ‘सीजेपी’चे नेते आशुतोष रांका यांनी दावा केला की, त्यांना, अभिजित दीपके आणि सौरव दास यांना शनिवार, १० ऑक्टोबरपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा कायदा किंवा इतर कलमांखाली अटक केली जाऊ शकते. आम्ही ६ जूनपासूनच तुरुंगात जाण्यासाठी सज्ज आहोत. देशात उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी लढणाऱ्या ३० वर्षांच्या तरुणांकडे गमावण्यासारखे काही नाही. तुम्ही आम्हाला अटक करू शकता, मारू शकता; पण थांबवू शकत नाही, असे रांका म्हणाले.

अभिजित दीपके यांनीही सरकारवर निशाणा साधत म्हटले, ‘यूएपीए’ किंवा तुरुंगवासाच्या धमक्या आम्हाला गप्प करू शकत नाहीत. आम्ही महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गाने शांततेत लढा सुरूच ठेवू. गृहमंत्री अमित शहा यांना उद्देशून दीपके यांनी सोशल मीडियावर लिहिले, किती जणांना अटक करणार? १० ऑक्टोबरला संपूर्ण देश रस्त्यावर उतरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news