CJP Protest: आशुतोष रांका, सौरव दास यांच्या सुटकेसाठी सीजेपी उच्च न्यायालयात; रात्रीच्या वेळी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी

‘कॉक्रोच जनता पार्टी’चे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या न्यायालयीन कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली असून, या आदेशाविरोधात सीजेपीच्या नेत्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Sourav Das and Ashutosh Ranka
Sourav Das and Ashutosh RankaFile Photo
Published on: 
Updated on: 

CJP Protest

नवी दिल्ली: ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या न्यायालयीन कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली असून, या आदेशाविरोधात तातडीने रात्रीच्या वेळी सुनावणी घ्यावी, अशी मागणी करत सीजेपीच्या नेत्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या विजयादशमीच्या सुट्ट्यांमुळे उच्च न्यायालय बंद आहे. असे असतानाही सीजेपी नेत्यांनी न्यायालयाकडे रात्रीच्या विशेष सुनावणीची विनंती केली आहे. मंदिर मार्ग पोलिस ठाण्यातील एका नवनियुक्त विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर सोमवारी हजर केल्यानंतर, या दोघांच्या न्यायिक कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्याचे आदेश देण्यात आले होते.

Sourav Das and Ashutosh Ranka
Abhijeet Dipke Stop Protest: अभिजीत दिपकेच्या ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनाला ब्रेक; सौरभ-आशुतोषबद्दल बोलताना डोळे पाणावले

जंतरमंतरवरील निदर्शनांनंतर कारवाई

यापूर्वी जंतरमंतर हे ठिकाण निदर्शनांसाठी प्रतिबंधित घोषित करण्यात आले होते. असे असताना १३ ऑक्टोबर रोजी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी प्रतिबंधित क्षेत्राचे कुलूपबंद प्रवेशद्वार ओलांडून आत प्रवेश केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते आणि सुरुवातीला पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

“आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत तातडीने रात्रीची सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. सौरभ आणि आशुतोष यांना एक मिनिटही तुरुंगात काढावे लागणे चुकीचे आहे. राजकीय खेळीमुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ नये. न्यायासाठी प्रतीक्षा केली जाऊ शकत नाही,” अशी प्रतिक्रिया सीजेपीच्या विधी सेलच्या प्रमुख रत्ना सिंह यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये दिली आहे.

सीजेपीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जंतरमंतरवर तिरंगा फडकवून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञान कुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यानंतर त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतले होते. सीजेपीने असाही गंभीर आरोप केला आहे की, पक्षाच्या दोन्ही नेत्यांना तुरुंगाबाहेर येण्यापासून रोखण्यासाठी जामिनाच्या सुनावणीमध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे.

Sourav Das and Ashutosh Ranka
Abhijeet Dipke : 'लॉरेन्स बिश्नोई साहब...' : अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ; दिल्ली पोलीस म्हणाले, 'स्लिप ऑफ टंग...'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news