Saurabh Das : 'सीजेपी'चे सौरभ दास यांना लंडनला जाण्यापासून का रोखण्यात आले? अखेर केंद्र सरकारने दिले स्‍पष्‍टीकरण

Saurabh Das Passport Discrepancy : पासपोर्टमधील जन्मस्थळाच्या माहितीतील विसंगतीमुळे कारवाई
 Saurabh Das Passport Discrepancy
Saurabh Das Passport Discrepancy File Photo.
Published on: 
Updated on: 

Saurabh Das Passport Discrepancy : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) सौरभ दास यांना लंडनला जाण्यापासून का रोखण्यात आले, या प्रश्नावर अखेर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पासपोर्टमधील जन्मस्थळाच्या (बर्थप्लेस) माहितीतील विसंगतीमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी आज (दि. २५) यासंदर्भात माहिती दिली.

सात दिवसांच्या आत आपले खरे जन्मस्थळ सांगा

चेन्नईच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने (RPO) कॉकरोच जनता पार्टीचे सह-संयोजक सौरभ दास यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसद्वारे त्यांना सात दिवसांच्या आत आपले खरे जन्मस्थळ सांगण्यास सांगण्यात आले असून, उत्तर मिळेपर्यंत पासपोर्टचा वापर न करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

 Saurabh Das Passport Discrepancy
Saurav Das Ashutosh Ranka: सौरभ दास, आशुतोष रांकाने बाहेर येताच केला 'कांड', पोलीस नोटीस पाठवणार?

पासपोर्टसाठीच्‍या अर्जातील माहित अचूक असणे अनिवार्य

याबाबत अधिक माहिती देताना जैस्वाल म्हणाले की, पासपोर्टसाठी अर्ज करताना अर्जदारांनी प्रत्येक माहिती अचूक आणि पूर्ण भरणे अनिवार्य असते. जन्मस्थळ, पत्ता, नाव आणि इतर आवश्यक तपशील बिनचूक असणे गरजेचे आहे. जर एखाद्या अर्जदाराविरोधात तक्रार आली किंवा त्याने कोणतीही माहिती लपवल्याचे अथवा चुकीची दिल्याचे निदर्शनास आले, तर पासपोर्ट कार्यालय तात्काळ नोटीस बजावून स्पष्टीकरण मागवते. ही एक नियमित आणि नियमांनुसार चालणारी प्रक्रिया आहे.

सौरभ दास यांनी केला होता विमानतळावर रोखण्यात आल्याचा आरोप

सोमवारी दिल्ली विमानतळावर आपल्याला रोखण्यात आल्याचा आरोप सौरभ दास यांनी केला होता. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे. दास यांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी रात्री १ वाजताच्या सुमारास ते लंडनला जाणाऱ्या विमानातून प्रवास करणार होते. त्याच वेळी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना रोखले. त्यांचा पासपोर्ट 'फ्लॅग' करण्यात आला असून (पासपोर्टवर बंदी घालण्यात आली आहे), त्यामुळे त्यांना प्रवासाची परवानगी देता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले होते.

 Saurabh Das Passport Discrepancy
UP Assembly Elections 2027 : "आम्ही भिकारी आहोत का...?" ; समाजवादी पार्टीने देऊ केलेल्‍या २६ जागांवरुन काँग्रेस भडकले

राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू

यानंतर वृत्तसंस्था 'पीटीआय'शी बोलताना सौरभ दास यांनी सांगितले होते की, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनने एका चर्चासत्राचे (पॅनेल डिस्कशन) आयोजन केले होते. या कार्यक्रमात 'कॉकरोच मूव्हमेंट'बद्दल आपले विचार मांडण्यासाठी ते ब्रिटनला जात होते. मात्र, ऐनवेळी रोखण्यात आल्याने त्यांचा प्रवास रद्द झाला आणि ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही या प्रकरणावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती.

 Saurabh Das Passport Discrepancy
CJP Delhi protest: गेल्या ७२ तासांत 'हुकूमशाह' मोदींनी आणीबाणीच्या काळातील घटनांनाही मागे टाकले; सीजेपीचा हल्लाबोल

जन्मस्थळाची अचूक माहिती लेखी स्वरूपात सादर करावी लागणार

दरम्यान, दास यांना लंडनला जाण्यापासून का रोखले गेले, याचे नेमके कारण आता परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यासोबतच पासपोर्ट कार्यालयाने सौरभ दास यांना सात दिवसांची मुदत दिली असून, या काळात त्यांना आपल्या जन्मस्थळाची अचूक माहिती लेखी स्वरूपात सादर करावी लागणार आहे. जोपर्यंत ते समाधानकारक उत्तर देत नाहीत आणि या प्रकरणाचा उलगडा होत नाही, तोपर्यंत त्यांना पासपोर्ट न वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.