UP Assembly Elections 2027 : "आम्ही भिकारी आहोत का...?" ; समाजवादी पार्टीने देऊ केलेल्‍या २६ जागांवरुन काँग्रेस भडकले

UP Assembly Elections 2027 : काँग्रेस नेते इम्रान मसूद यांनी व्‍यक्‍त केली तीव्र नाराजी
UP Assembly Elections 2027
UP Assembly Elections 2027Pudhari News.
Published on: 
Updated on: 

UP Assembly Elections 2027 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीची रणधुमाळी सुरू झाली आहे. समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्‍या सोमवार, २३ नोव्‍हेंबर रोजी जागावाटपाबाबत दिल्‍लीत चर्चा झाली. एका रिपोर्टनुसार, समाजवादी पक्षाच्या एका वरिष्ठ राष्ट्रीय सरचिटणीसांनी काँग्रेसला २६ जागांची यादी दिली होती. मंगळवारी समाजवादी पक्षाच्या प्रमुखांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले: "आम्ही जिंकण्यायोग्य २६ जागांपासून सुरुवात केली आहे; परस्पर समंजसपणा आणि सुज्ञतेने ही प्रक्रिया पुढे जाईल." मात्र आता या प्रस्‍ताववर काँग्रेसच्‍या नेत्‍यांनी तीव्र संताप व्‍यक्‍त केला आहे.

समाजवादी पार्टीची पहिली यादी जाहीर

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच, समाजवादी पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते इम्रान मसूद यांनी म्हटले आहे की, "मला हे काहीच समजत नाही; हे माझ्या आकलनाच्या पलीकडचे आहे.यावर पक्षालाच निर्णय घ्यावा लागेल"

UP Assembly Elections 2027
PROPERTY RIGHTS : 'घरजावई' प्रथेला हायकोर्टाने फेटाळले! महिलांच्‍या वारसाहक्‍कांबाबत उच्‍च न्‍यायालयाने कोणता आदेश दिला?

आम्ही काय भिकारी आहोत का?

इम्रान मसूद म्हणाले की, "मला हे समजत नाहीये. आम्ही काय भिकारी आहोत का? आमच्याशी असा व्यवहार केला जातोय? आम्ही मागणीही केलेली नसताना आमच्यासाठी २६ जागा जाहीर केल्या गेल्या! आम्ही तर जागांची मागणीही केली नव्हती. तुमची कार्यपद्धती स्वतःच्या अटी लादण्याची असेल, तर माझ्यासारख्या स्वाभिमानी व्यक्तीला हे मान्य होऊ शकत नाही."

सोमवारी झाली होती चर्चा

समाजवादी पक्ष (सपा) आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाबाबत सोमवारी दिल्लीत चर्चा झाली होती. सूत्रांनुसार, समाजवादी पक्षाच्या एका वरिष्ठ राष्ट्रीय सरचिटणीसांनी काँग्रेसला २६ जागांची यादी दिली होती. मंगळवारी समाजवादी पक्षाच्या प्रमुखांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले: "आम्ही जिंकण्यायोग्य २६ जागांपासून सुरुवात केली आहे; परस्पर समंजसपणा आणि सुज्ञतेने ही प्रक्रिया पुढे जाईल."

UP Assembly Elections 2027
UP Assembly Elections : ‘चंद्रशेखर आझाद हा आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा’; असदुद्दीन ओवैसींची मोठी घोषणा, यूपीच्या राजकारणात धमाका

चर्चेत असलेल्या जागा

काँग्रेसला देऊ केलेल्या २६ जागांमध्ये रामपूर खास, फरेन्दा, मथुरा, खेरागढ, जगदीशपूर, किडवाई नगर, बागपत, मोदीनगर, हापूर, जेवार, स्याना, खुर्जा, खैर, इगलास, मांट, आग्रा उत्तर, फतेहपूर सिक्री, बिलग्राम-मल्लावान, गोविंद नगर, नानपारा, गोरखपूर शहर, खजनी, पडरौना, फाजिलनगर, पिंडरा आणि वाराणसी कॅन्टोन्मेंट या मतदारसंघांचा समावेश असल्‍याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यापूर्वी समाजावादी पाटीने काँग्रेसला ५४ जागा देवू केल्‍या असल्‍याची चर्चाही सोशल मीडियावर रंगली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.