

Saurav Das Ashutosh Ranka: कॉकरोच जनता पार्टीचे दोन मुख्य नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. मात्र जामीनावर बाहेर आल्यानंतर लगेचच सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी एक कांड केला आहे. दोघांनाही पोलिसांनी हजर होण्यासाठी सांगितलं होतं. मात्र हे दोघेही हजर झालेले नाहीत. त्यांनी अधिकचा वेळ मागितला आहे. अशा परिस्थितीत दिल्ली पोलीस या दोघांना नोटीस जारी करू शकतात. दिल्ली पोलिसांनी दोन्ही सीजेपी नेत्यांना राजौरी गार्डन कार्यालयात बोलवलं होतं. मात्र दोघांना दोन दिवसांपूर्वीच न्यायालयीन कोठडीतून सोडण्यात आलं होतं.
कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी समन्स बजावला होता. मात्र गुरूवारी हे दोन्ही नेते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांसमोर हजर होण्यासाठी या दोघांनी वेळ मागून घेतली आहे. त्यामुळं आता दिल्ली पोलिसांकडून त्यांना नवी नोटीस देण्यात येण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी
तिहार जेलमधून सुटल्यानंतर सौरभ दासने भाजपवर हल्लाबोल केला होता. त्याने आपल्या पक्षाच्या जुन्या मागण्यांचा पुनरूच्चार केला होता. त्याने गौरव भाटिया यांच्या वक्तव्यावर काहीतरी नवीन घेऊ या असं म्हणत प्रत्युत्तर दिलं होतं. स्कीप्ट रिपीट करून काय फायदा नाही असं ते म्हणाले.
स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट कोर्टाने शांतता कायम ठेवण्याच्या अटीवर आणि बॉन्डवर आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना जामीन दिला होता. त्या दोघांनाही ५० हजार रूपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर बाहेर सोडण्यात आलं आहे. तसेच त्यांना सुनावणीच्या तारखांना हजर राहण्यास देखील सांगितलं आहे. लिखित अटींनुसार त्यांनी कायद्याचे उल्लंघन करणार नाही आणि शांतता कायम ठेवण्यात येईल असे आश्वासन दिलं आहे. त्यांचे भविष्यातील आंदोलन हे कायद्याच्या चौकटीतच असणार अशी हमी देखील दिली आहे.