

CJP Parliament March: गेल्या तीन अठवड्यापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर देशातील शिक्षण प्रणाली सुधारण्यासाठी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी करत कॉक्रोज जनता पार्टी आंदोलन करत आहे. प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि शास्त्रज्ञ सोनम वांगचुक हे आमारण उपोषणावर बसले आहेत. आज कॉक्रोज जनता पार्टीने संसदेवर मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यापूर्वी गेल्या तीन आठवड्यात एकदाही या आंदोलनाकडे ढुमकूनही न पाहणाऱ्या सरकारने पहिल्यांदाच आंदोलनकर्त्यांशी संपर्क केल्याचा दावा केला जात आहे.
कॉक्रोज जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी हिंदूस्थान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार कॉक्रोज जनता पक्षाशी केंद्र सरकाराने पहिल्यांदाच संपर्क केला आहे.
दरम्यान, सोनम वांगचुक हे गेल्या तीन आठवड्यापासून जंतर मंतरवर आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांना १८ जुलै रोजी बळजबरीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी पोलीस बळाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता.
त्यानंतर कॉक्रोज जनता पार्टीने आपलं आंदोलन अजून तीव्र केलं. अभिजीत दिपके देखील आमरण उपोषणाला बसला. त्यानंतर आज २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याचा देखील निर्णय झाला. त्यानंतर चलो संसद अशी हाक देण्यात आली. दरम्यान, या मोर्चाला प्रशासनाकडून परवानगी आहे की नाही याबाबत अजून कोणतीही स्पष्टता मिळालेली नाहीये. दिल्ली पोलिसांनी सोशळ मीडियावरून संसद परिसरात भारतीय न्याय संहिता कलम १६३ लागू करण्यात आलं आहे असं सांगितलं. या प्रकारच्या मार्चला कोणतीही परवानगी नसल्याचं सांगितलं.
डीसीपी यांनी सीजेपी प्रवक्ता सौरव दास यांच्याशी जंतर मंतरवर संपर्क साधला. त्यावेळी पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती देखील व्यक्त केली. मात्र सीजेपीने आम्ही अहिंसक मार्गाने आंदोलन करू असं सांगितलं आहे. याबाबतचा निर्णय अभिजीत दिपके यांच्याशी बोलून घेतला जाईल असं देखील प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं.