CJP Parliament March Protest: पोलिसांनी दिपकेंना उचललं... मोर्चा जवळ येताच पंतप्रधानांनी सोडलं संसद भवन

CJP Parliament March Protest:
CJP Parliament March Protest:pudhari
Published on
Updated on

CJP Jantar Mantar Protest: कॉक्रोज जनता पक्षाचे चलो संसद आंदोलन आता संसदेच्या दारावर पोहचलं आहे. दरम्यान, संसदेकडे कूच करणाऱ्या आंदोलक अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस आंदोलकांवर लाठीचार्ज करत असून त्यांना संसद परिसरातून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन सोडलं असून पोलिसांनी अभिजीत दिपके यांना देखील ताब्यात घेतलं आहे.

CJP Parliament March Protest:
CJP Parliament March: जंतर मंतरवर दगडांनी भरलेला ट्रक; आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले, पोलिसांचा लाठीचार्ज, पाहा व्हिडिओ

कॉक्रोज जनता पार्टीने चलो संसदची हाक दिल्यानंतर आत संसदेवर मोठ्या प्रमाणावर तरूणांनी मोर्चा काढला आहे. दरम्यान, ज्यावेळी स्वराज जनता पार्टीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे मोर्चास्थळी पोहचले त्यानंतर आंदोलक नियंत्रणाबाहेर गेल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतरच पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला.

CJP Parliament March Protest:
CJP Parliament March: सरकारने अखेर कॉक्रोज जनता पार्टीची घेतली दखल... संसदेवर मोर्चा सुरू होण्यापूर्वी CJP ने केले मोठा दावा

संसदेत हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद परिसरातून देशाला संबोधित केलं. त्यानंतर संसदेचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळं कामकाज तहकूब करण्यात आलं. दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद परिसर सोडला. त्यांनी परिसर सोडल्यानंतर सुरक्षा दलांनी संसदेचं गेट बंद करून घेतलं आहे.

CJP Parliament March Protest:
Unique Protest : 'हा पाताळलोकाचा रस्ता आहे...' शिडी लावून रस्त्यावरील खड्ड्यात उतरले सपा नेता; व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, ज्या गेटमधून पंतप्रधान बाहेर पडत होते त्याच गेटच्या बाहेर पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. आंदोलकांना पांगवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेतून बाहेर पडण्यासाठी उशीर झाला. ते नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटांनी उशिरा बाहेर पडले.

सरकारने आंदोलन मोठं होत आहे पाहून चर्चेची दारे उघडली. नड्डा यांनी आंदोलकांसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली. सीजेपी पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं की आंदोलकांनी नड्डांसोबत झालेल्या चर्चेत सीजेपीने त्वरित तीन मागण्या केल्या आहेत.

१ सोनम वांगचुक यांना त्वरित सोडण्यात यावं

२ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा

३ आपलं जीवन संपवलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रूपये नुकसान भरपाई द्यावी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news