Unique Protest : 'हा पाताळलोकाचा रस्ता आहे...' शिडी लावून रस्त्यावरील खड्ड्यात उतरले सपा नेता; व्हिडिओ व्हायरल

रस्त्याच्या खड्ड्यात शिडी लावून उतरले सपा नेते; आग्र्यातील अनोखे आंदोलन चर्चेत
agra sp leader climbs into pothole claiming it leads to patal lok
Unique Protest : 'हा पाताळलोकाचा रस्ता आहे...' शिडी लावून रस्त्यावरील खड्ड्यात उतरले सपा नेता; व्हिडिओ व्हायरलfile photo
Published on
Updated on

agra sp leader climbs into pothole claiming it leads to patal lok unique protest

पुढारी ऑनलाईन : आग्र्यातील रस्त्यावरील मोठ्या खड्ड्याविरोधात करण्यात आलेल्या एका अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. समाजवादी पक्षाचे (सपा) नेते नितीन कोहली यांनी शिडी लावून थेट रस्त्यावरील खड्ड्यात उतरून आंदोलन केले. "हा रस्ता नसून पाताळलोकाकडे जाणारा मार्ग आहे," असे म्हणत त्यांनी प्रशासन आणि सरकारवर टीका केली. या अनोख्या आंदोलनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

agra sp leader climbs into pothole claiming it leads to patal lok
Vishwas Nangare Patil: IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केल्याचा व्हिडिओ व्हायरल

आग्र्यातील पॉश समजल्या जाणाऱ्या कमला नगर परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

याच समस्येवर लक्ष वेधण्यासाठी सपा नेते नितीन कोहली आपल्या समर्थकांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रस्त्याच्या मधोमध असलेल्या खोल खड्ड्याजवळ शिडी लावली आणि त्यातून थेट खड्ड्यात उतरले. खड्ड्यात उभे राहून त्यांनी, "हा रस्ता नसून पाताळलोकाकडे जाणारा मार्ग बनला आहे," असे म्हणत सरकारच्या विकासाच्या दाव्यांवर टीका केली. शहरातील पॉश वसाहतींमधील रस्त्यांचीही अशी दुरवस्था असल्याचे त्यांनी नमूद केले.

agra sp leader climbs into pothole claiming it leads to patal lok
Opposition to AI cameras | एआय कॅमेऱ्यांनाही विरोध

या आंदोलनादरम्यान स्थानिक नागरिकांनीही रस्त्यांच्या खराब अवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अपघातांचा धोका अधिक वाढतो. विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

नितीन कोहली यांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. लवकरात लवकर कारवाई न झाल्यास स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, या अनोख्या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. काहींनी या आंदोलनाच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे कौतुक केले असून, तर अनेकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाला प्रश्न विचारले आहेत. अद्याप या आंदोलनावर प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर आणि आंदोलनानंतर तरी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news