Abhijeet Dipke Protest: कॉकरोच आता रस्त्यावर उतरणार; अभिजित दिपके 6 जूनला भारतात येणार, दिल्लीत आंदोलनाची तयारी सुरू

Abhijeet Dipke Protest: सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके 6 जून रोजी भारतात परतणार असून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनात सहभागी होणार आहेत.
Abhijeet Dipke Protest Delhi
Abhijeet Dipke Protest DelhiPudhari
Published on
Updated on

Abhijeet Dipke Protest Delhi: NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) या व्यंगात्मक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे संस्थापक अभिजित दिपके यांनी शांततापूर्ण आंदोलनाची घोषणा केली आहे. यासाठी ते 6 जून रोजी भारतात परतणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

CJP च्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये दिपके यांनी देशभरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. "भारतीय राज्यघटनेच्या मार्गाने शांततापूर्ण पद्धतीने आपला आवाज उठवण्याची वेळ आली आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर सरकारला आपला आवाज ऐकावा लागेल," असे त्यांनी म्हटले आहे.

दिपके यांनी सांगितले की, ते 6 जून रोजी सकाळी दिल्लीत दाखल होतील. त्यानंतर समर्थकांसह संसद मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलनासाठी परवानगी मागण्यात येणार आहे.

Abhijeet Dipke Protest Delhi
IPL 2026 Prize Money: RCB वर 20 कोटींचा वर्षाव! विराटला फक्त 5 लाख? वैभव सूर्यवंशीला किती लाख मिळाले? पुरस्कारांची संपूर्ण यादी

NEET प्रकरणावरून सरकारवर टीका

दिपके यांनी NEET पेपरफुटी प्रकरणाचा उल्लेख करत लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप केला. "NEET, CBSE, CUET आणि SSC GD अशा विविध परीक्षांमधील एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य अनिश्चिततेत ढकलले गेले आहे. विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. या परिस्थितीची जबाबदारी कोणीतरी स्वीकारली पाहिजे," असे ते म्हणाले.

त्यांनी दावा केला की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन याचिकेला सुमारे 8 लाख विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच सोशल मीडियावर कोट्यवधी लोकांनी या मोहिमेला समर्थन दिल्याचेही त्यांनी सांगितले.

देशभरात आंदोलनांचा दावा

दिपके यांच्या मते, लखनऊ, जयपूर, महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये या मुद्द्यावर आंदोलन सुरू असून विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी वाढत आहे. मात्र, सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Abhijeet Dipke Protest Delhi
Microsoft Bill Gates: एपस्टीन प्रकरणामुळे बिल गेट्स अडचणीत? मायक्रोसॉफ्टच्या कार्यक्रमात 'नो एन्ट्री', नेमकं काय घडलं?

CJP आणि वाद

अभिजित दिपके हे मे महिन्यात 'कॉकरोच जनता पार्टी' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे चर्चेत आले. सुरुवातीला व्यंगचित्रे आणि राजकीय भाष्य करणारे हे व्यासपीठ पुढे युवकांच्या भावना व्यक्त करणारे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनले.

दरम्यान, मे महिन्याच्या अखेरीस केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69(A) अंतर्गत CJP चे X (पूर्वीचे ट्विटर) खाते भारतात ब्लॉक करण्याचे निर्देश दिले होते.

याविरोधात दिपके यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने तत्काळ खाते सुरू करण्यास नकार दिला होता. आता 6 जून रोजी प्रस्तावित आंदोलनाकडे विद्यार्थी, पालक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news