CJP Spokesperson: मोठी राजकीय खेळी! कॉकरोच जनता पार्टीने जाहीर केले तीन नवे चेहरे; आंदोलनासाठी नवी टीम मैदानात

CJP Spokesperson Announcement: कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने तीन अधिकृत प्रवक्त्यांची घोषणा केली असून शोध पत्रकार सौरव दास यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे.
CJP Spokesperson Announcement
CJP Spokesperson AnnouncementPudhari
Published on
Updated on

CJP Spokesperson Announcement: सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीने (CJP) बुधवारी आपल्या तीन अधिकृत प्रवक्त्यांची घोषणा केली. पक्षाच्या वतीने आंदोलने, जनसंपर्क आणि माध्यमांशी संवाद साधण्याची जबाबदारी या तिघांवर सोपवण्यात आली आहे. यामध्ये शोध पत्रकार सौरव दास यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती देताना सांगितले की, सौरव दास मुख्य प्रवक्त्याची भूमिका पार पाडतील. त्यांच्यासोबत राजकीय संशोधक, लेखक आणि चित्रपट निर्माते विजेता दहिया तसेच आयआयटी कानपूर आणि जागतिक व्यवस्थापन सल्लागार कंपनी मॅककिन्सेचे माजी विद्यार्थी आशुतोष रांका हेही प्रवक्ते म्हणून काम पाहतील.

पक्षाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "भारतातील राजकीय चर्चेची दिशा बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि या परिवर्तनाचे नेतृत्व नव्या पिढीतील नेते करतील."

सौरव दास यांच्याकडे मुख्य जबाबदारी

सौरव दास हे कायदा, न्यायव्यवस्था आणि सामाजिक विषयांवरील शोध पत्रकारितेसाठी ओळखले जातात. पक्षाच्या दाव्यानुसार, नोव्हेंबर 2025 मध्ये इंडिया गेट येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदूषणविरोधी आंदोलनांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

CJP Spokesperson Announcement
DK Shivkumar: डीकेंच्या हाती 'शिव'धनुष्य

विजेता दहिया आणि आशुतोष रांका यांचाही समावेश

राजकीय विश्लेषक, लेखक आणि चित्रपट निर्माते विजेता दहिया यांना देखील प्रवक्त्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विविध यूट्यूब कंटेंट निर्मात्यांसाठी संशोधन आणि लेखनाचे काम त्यांनी केले आहे. दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठाचे (DTU) पदवीधर असलेल्या दहिया यांनी Power of Universe आणि To Hell With That Job ही पुस्तके लिहिली आहेत. तसेच 'दरारें' आणि 'ओपरी पराई' या हरियाणवी चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, आयआयटी कानपूर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे माजी विद्यार्थी आशुतोष रांका यांचाही पक्षाच्या प्रवक्त्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. रांका यांनी यापूर्वी लंडनमध्ये मॅककिन्से अँड कंपनीमध्ये काम केले आहे. गेल्या वर्षी भारतात परतल्यानंतर ते पर्यावरण, शिक्षण आणि युवकांच्या प्रश्नांशी संबंधित विविध जनआंदोलनांमध्ये सक्रिय आहेत.

CJP Spokesperson Announcement
RBI gold reserves: सरकारने १२ अब्ज डॉलर्सचे सोने विकले? आरबीआयने पहिल्यांदाच सांगितले संपूर्ण सत्य

अभिजीत दीपके यांच्या भारत आगमनापूर्वी घोषणा

या नियुक्त्यांची घोषणा CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या भारतात परतण्याच्या नियोजित कार्यक्रमापूर्वी करण्यात आली आहे. दीपके 6 जून रोजी भारतात परतणार असून, कथित NEET प्रश्नपत्रिका लिक प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करण्याचा पक्षाचा मानस असल्याचेही सांगितले जात आहे.

गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियावर झपाट्याने लोकप्रिय झालेल्या कॉकरोच जनता पार्टीने विशेषतः विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. नव्या प्रवक्त्यांच्या नियुक्तीनंतर पक्षाची संघटनात्मक तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news