CJI Suryakant : 'बाह्य शक्तीं'नी रोखण्याचा प्रयत्न केला, पण..." : NLSIU दीक्षांत समारंभातील वादावर सरन्यायाधीश काय म्हणाले?

मूठभर लोकांपेक्षा प्रामाणिक बहुमताची ताकद वरचढ असल्याचे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले
CJI Suryakant : 'बाह्य शक्तीं'नी रोखण्याचा प्रयत्न केला, पण..." : NLSIU दीक्षांत समारंभातील वादावर सरन्यायाधीश काय म्हणाले?
Published on: 
Updated on: 

CJI Suryakant on NLSIU convocation controversy : "बंगळुरू येथील ‘नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी’च्या (NLSIU) ३४ व्या दीक्षांत समारंभावर काही बाह्य शक्तींनी अनिश्चिततेचे सावट निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. काही अनपेक्षित आणि दुर्दैवी परिस्थितीमुळे हा सोहळा पूर्व नियोजित वेळेत पार पडेल की नाही, अशी शंका निर्माण झाली होती," असा गौप्यस्फोट सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज (दि. १७ ऑक्टोबर) केला.

काय घडलं होतं?

एनएलएसआययू प्रशासनाने ‘अपरिहार्य कारणांमुळे’ १२ सप्टेंबर २०२६ रोजी होणारा ३४ वा दीक्षांत समारंभ रद्द केल्याची घोषणा केली होती. २०२६ च्या बॅचला उपस्थितीशिवाय (इन ॲब्सेंशिया) पदवी बहाल केली जाईल, अशी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. या दीक्षांत समारंभास सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती मिश्रा यांच्या उपस्थितीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. चालू वर्षातील ७०० हून अधिक विद्यार्थी, पदवीधर आणि माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या सहभागावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. याआधी हैदराबाद येथील 'नालसार' (NALSAR) विधी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातही सरन्यायाधीशांच्या उपस्थितीला विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला होता. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर अखेर हा दीक्षांत सोहळा पार पडला.

CJI Suryakant : 'बाह्य शक्तीं'नी रोखण्याचा प्रयत्न केला, पण..." : NLSIU दीक्षांत समारंभातील वादावर सरन्यायाधीश काय म्हणाले?
Congress Supreme Court March: काँग्रेसच्या सर्वोच्च न्यायालय मार्चला CJI सूर्यकांत यांनी दिला झटका; राहुल गांधींसमोर मोठा पेच

दीक्षांत समारंभावर होती अनिश्चितता : सरन्‍यायाधीश सूर्यकांत

शुक्रवारी (दि. १६ ऑक्टोबर) विश्वविद्यालय कुलगुरू या नात्याने उपस्थितांना संबोधित करताना सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, "दीक्षांत समारंभाच्या काही दिवस आधी विविध अडचणींचा सामना करावा लागला. बाह्य घटकांमुळे निर्माण झालेल्या अनपेक्षित आणि दुर्दैवी घटनांमुळे या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत एक प्रकारची अनिश्चितता पसरली होती. हा सोहळा सुरळीत पार पडेल की नाही, अशी स्थिती क्षणभर निर्माण झाली होती."

CJI Suryakant : 'बाह्य शक्तीं'नी रोखण्याचा प्रयत्न केला, पण..." : NLSIU दीक्षांत समारंभातील वादावर सरन्यायाधीश काय म्हणाले?
CJI Surya Kant: "तुमची हिंमत कशी झाली?" CJP आंदोलनावरून दंडाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्याला नोटीस बजावल्याने सरन्यायाधीश संतापले

विद्यार्थ्यांनी दडपशाहीऐवजी मोकळ्या संवादाचा मार्ग निवडला

"या गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपली निष्ठा सिद्ध केली आहे. अडथळे आणि अफवांना बाजूला सारून विद्यार्थ्यांनी आपले स्थान बळकट केले. दडपशाहीऐवजी मोकळ्या संवादाचा मार्ग निवडून प्रामाणिक बहुमताची ताकद ही मूठभर लोकांपेक्षा नेहमीच वरचढ ठरते, हेच या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे," असेही सरन्‍यायाधीशांनी नमूद केले.

CJI Suryakant : 'बाह्य शक्तीं'नी रोखण्याचा प्रयत्न केला, पण..." : NLSIU दीक्षांत समारंभातील वादावर सरन्यायाधीश काय म्हणाले?
CJI Surya Kant : ‘माझ्या भगिनी या प्रकरणाची सुनावणी करणार नाहीत!’: भाजप नेत्याच्या याचिकेवर CJI सूर्यकांत असं का म्हणाले?

कायद्याच्या क्षेत्रातील मूल्यांवर भाष्य

"कायद्याच्या क्षेत्रात काम करताना न्यायाच्या बाजूने उभे राहण्याचे धैर्य आणि उपेक्षित घटकांचे ऐकून घेण्याची नम्रता असणे अत्यंत आवश्यक आहे. वैचारिक स्वातंत्र्य आणि निष्पक्षता ही या क्षेत्राची खरी ताकद आहे. कोणावरही अंतिम निर्णय लादण्यापूर्वी तिचे म्हणणे ऐकून घेणे आणि मतभेद असले तरी समोरच्या व्यक्तीच्या सन्मानाला धक्का न लावणे हीच खरी वैचारिक प्रगल्भता आहे," असा सल्‍लाही त्‍यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

CJI Suryakant : 'बाह्य शक्तीं'नी रोखण्याचा प्रयत्न केला, पण..." : NLSIU दीक्षांत समारंभातील वादावर सरन्यायाधीश काय म्हणाले?
CJI Surya Kant : देशातील तरुणाईचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे’; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा यंत्रणांना संयम बाळगण्याचा सल्ला

प्रामाणिकपणाची कास कधीही सोडू नका...

कायदा महाविद्यालय हे वेगवेगळ्या विचारांचे मंथन होण्याचे ठिकाण असते, असे सांगत त्यांनी प्रामाणिकपणाची कास कधीही सोडू नका, असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. प्रामाणिकपणाचा ध्यासच वकिली व्यवसायात तुमची प्रतिष्ठा मजबूत करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news