CJI Suryakant | “घृणास्पद, निर्लज्ज आणि खोडसाळ...": CJI सूर्यकांत संतापले! सोशल मीडियावरील 'ते' जातीवाचक विधान बनावट

CJI Suryakant | सरन्यायाधीशांच्या नावाचा वापर करत खोटा मेसेज व्हायरल
CJI Suryakant slams fake social media posts
सरन्यायाधीश सूर्यकांत. Pudhari
Published on
Updated on

CJI Suryakant slams fake social media posts

नवी दिल्ली: सोशल मीडियावर आपल्या नावाचा वापर करून पसरवण्यात येत असलेल्या एका चुकीच्या विधानाचा सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अत्यंत दुर्मिळ अशा या थेट प्रतिक्रियेत, सरन्यायाधीशांनी ते विधान पूर्णपणे नाकारले आहे.

सरन्यायाधीशांच्या नावाचा वापर करत खोटा मेसेज व्हायरल

सोशल मीडियावरील एका अकाउंटने सरन्यायाधीशांच्या नावावर खालील विधान (मूळ हिंदीत) खोट्या पद्धतीने खपवले होते. "जर एखाद्या समाजाने आपल्यामधून IAS, IPS, सरन्यायाधीश, राष्ट्रपती आणि पंतप्रधान दिलेले असतानाही तो समाज स्वतःला शोषित समजत असेल, तर दोष ब्राह्मणांचा नाही तर त्यांच्या स्वतःच्या मानसिकतेचा आहे.

CJI Suryakant slams fake social media posts
CJI Surya Kant | ‘ओव्हरस्मार्ट बनू नका, आम्हाला सगळं माहिती आहे’; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी वकिलाला का झापले?

“घृणास्पद, निर्लज्ज आणि खोडसाळ"

'पीटीआय'ला (PTI) दिलेल्या निवेदनात सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे की, "एक बनावट विधान तयार करणे आणि ते देशातील सर्वोच्च न्यायिक पदाच्या नावावर खपवणे, हा अत्यंत अप्रामाणिकपणा, जाणूनबुजून केलेली सामाजिक प्रक्षोभकता आणि घटनात्मक मूल्यांचा अवमान आहे. हा “घृणास्पद, निर्लज्ज आणि खोडसाळ प्रकार आहे.

CJI Suryakant slams fake social media posts
Supreme Court | 'व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी'तून आलेली माहिती स्वीकारता येणार नाही : न्यायमूर्ती नागरत्ना नेमकं काय म्हणाल्या?

... हा तर कायद्याच्या राज्याच्या मूळावरच घाला

"असे बेजबाबदार वर्तन न्यायपालिकेवरील जनतेचा विश्वास आणि कायद्याच्या राज्याच्या मूळावरच घाला घालते." हे दावे पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट करताना निवेदनात म्हटले आहे की, "हे आरोप पूर्णपणे निराधार, द्वेषपूर्ण आणि धादांत खोटे आहेत."

CJI Suryakant slams fake social media posts
SUPREME COURT : "सुप्रीम कोर्टात तुमची एंट्रीच बंद करू..." : सरन्यायाधीश सूर्यकांत याचिकाकर्त्यावर का भडकले?

अफवा पसरवण्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन

यासोबतच अफवा पसरवण्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करत निवेदनात म्हटले आहे की, "माननीय सरन्यायाधीशांचे कार्यालय सर्व जबाबदार नागरिक, प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आवाहन करते की, त्यांनी अशा खोट्या आणि बनावट मजकुराचा प्रसार करू नये."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news