

China deploy military in Balochistan: बलोच नेते मीर यार बलोच यांनी चीन पाकिस्तान यांच्यातील वाढत्या संबंधांवरून गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी दावा केला आहे की येत्या काही महिन्यात चीन त्यांचे लष्कर पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये तैनात करण्याची शक्यता आहे.
मीर यार बलोच यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना खुल पत्र लिहिलं आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मीर यार बलोच यांनी एक्सवरून हे पत्र शेअर केलं. त्यात त्यांनी बलोच प्रतिनिधी हे पाकिस्तान आणि चीन यांच्यातील वाढत्या रणनैतिक भागिदारीकडे अत्यंत धोकादायक म्हणून पाहत आहे.
मीर म्हणाले की, बलुचिस्तान पाकिस्तानच्या नियंत्रणात अनेक दशके दमनशाही पाहतो आहे. त्यांनी या भागात सरकार पुरस्कृत हिंसाचार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा दावा केला.
ते म्हणाले, 'बलुचिस्तानवर पाकिस्ताननं कब्जा केला आहे. सरकार पुरस्कृत दहशतवाद आणि मानवी हक्कांचे दमन हे गेल्या ७९ वर्षापासून सुरू आहे. आता यांना मुळापासून उखडून टाकून आमच्या देशात शांतता प्रस्थापित करण्याची वेळ आली आहे.
जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात मीर म्हणतात चीन आणि पाकिस्तान हे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) च्या फायनल स्टेजकडे वेगाने वाटचाल करत आहेत. हा चीनचे राष्ट्राध्यक्ष जिंगपिंग यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असून तो बलुचिस्तानमधून जातो. द रिपब्लिक बलुचिस्तान पाकिस्तान आणि चीनच्या या युतीकडे अत्यंत धोकादायक म्हणून पाहतो.' आम्ही चीनला त्यांच्या पाकिस्तानसोबतच्या वाढच्या भागीदारीवरून इशारा देत आहोत असेही मीर बलोच म्हणाले.
ते पुढे म्हणाले, 'बलोच विद्रोह आणि त्यांच्या सुरक्षा दल ताकद वाढली नाही तर या भागात चीनच्या लष्कराची थेट हलचाल सुरू होईल. चीन त्यांचे लष्कर स्थानिक लोकांच्या परवानगीशिवाय तैनात केले तर त्याचे गंभीर परिणाम परिणाम या भागाला भोगावे लागतील. भविष्यात बलुचिस्तान अन् भारत दोघांसाठीही हे मोठं आव्हान असणार आहे.