

S Jaishankar on greatest diplomats
पुणे: "सामान्यतः आपण महाभारताकडे सत्तासंघर्ष किंवा कौटुंबिक वादाच्या दृष्टीने पाहतो. तसेच रामायणातील गुंतागुंत, तेथील रणनीती, डावपेच आणि नियोजन यांचा आपण नैसर्गिकरित्या विचार करत नाही. मात्र, जेव्हा मला जगातील महान मुत्सद्दी कोण, असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा मी प्रभू श्रीकृष्ण आणि हनुमान यांचा उल्लेख जगातील 'सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी' (Diplomats) असा केला, अशा शब्दांमध्ये परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी यांनी भारतीय संस्कृतीतील महाकाव्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला.
पुणे येथे आज (दि. २० डिसेंबर) आयोजित एका कार्यक्रमात बोलताना परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी यावेळी हनुमानांच्या लंका भेटीचे उदाहरण दिले. ते म्हणाले, "हनुमान यांना लंकेत माहिती गोळा करण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यांनी केवळ गुप्तचर म्हणून यशस्वी कामगिरी केली नाही, तर माता सीतेपर्यंत पोहोचून त्यांचे मनोबल वाढवण्याचे महत्त्वपूर्ण कामही केले. हनुमान हे रामायणातील, तर श्रीकृष्ण हे महाभारतातील सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी होते," असेही जयशंकर यांनी नमूद केले.
"सामान्यतः आपण महाभारताकडे सत्तासंघर्ष किंवा कौटुंबिक वादाच्या दृष्टीने पाहतो. तसेच रामायणातील गुंतागुंत, तेथील रणनीती, डावपेच आणि नियोजन यांचा आपण नैसर्गिकरित्या विचार करत नाही, असे नमूद करत संस्कृतीचा वारसा मांडणे आवश्यक भारतीय इतिहासातील अशा महान व्यक्तिमत्त्वांचे कार्य जगासमोर मांडणे गरजेचे असल्याचे सांगत ते म्हणाले की, जर आपण अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांना जगासमोर योग्य प्रकारे सादर केले नाही, तर तो आपल्या संस्कृतीवर मोठा अन्याय ठरेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.