Crime News : ३६ वर्षे फाईव्ह स्टार हॉटेल्सना गंडवले; 'सिरीयल किलर' चार्ल्स शोभराजला रोल मॉडेल मानणारा महाठग अखेर गजाआड!

तीन दशकांहून अधिक काळ चालवलेल्‍या फसवणुकीच्‍या सत्राने पोलीसही चक्रावले!

Charles Sobhraj Admirer Hotel Conman
Charles Sobhraj Admirer Hotel ConmanPudhari
Published on
Updated on

Charles Sobhraj Admirer Hotel Conman : तो गेली ३६ वर्षांहून अधिक काळ 'शाही पाहुणा' म्हणून फाईव्ह स्टार हॉटेल्समध्‍ये राहायचा, बिल भरण्याची वेळ आली की पोबारा करायचा. ही फिल्‍मी स्‍टाईल स्‍टोरी नसून, एका ६९ वर्षीय महाठगाची खरी कहाणी आहे. वारंवार त्‍याला अटकही झाली. मात्र कारागृहाच्‍या बाहेर येताच पुन्‍हा फसवणुकीची मालिका तो नव्‍याने सुरू करायचा. अखेर पुन्‍हा एकदा त्‍याच्‍या गुन्‍ह्याची वेळ भरली! बेड्या ठोकताच महाठग बिंगसन जॉन याने केलेला खुलासा ऐकून पोलीसही चक्रावले. विशेष म्‍हणजे या फसवणुकीच्या मागे त्याचा रोल मॉडेल होता सिरीयल किलर आणि महाठग 'चार्ल्स शोभराज'! शोभराजच्या गुन्हेगारी पॅटर्नवरूनच आपण आपला गुन्‍ह्याचा पॅटर्न तयार केल्‍याची कबुली जॉनने पोलिसांसमोर दिली आहे.

'सिरीयल किलर' चार्ल्स शोभराज सारखी लाईफस्‍टाईल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान मूळचा तामिळनाडूचा रहिवासी असलेल्या बिंगसन जॉनने कबूल केले की, त्याने आपली लाईफस्‍टाईल (जीवनशैली) शोभराजच्या धर्तीवर घडवली होती. यात भारतभर प्रवास करणे, बनावट ओळखीचा वापर करून आलिशान हॉटेल्समध्ये राहणे, तिथल्या सुखसोयींचा आनंद घेणे आणि बिल भरण्याची वेळ आली की पोबारा करणे, असे त्‍याच्या गुन्‍ह्याचे स्‍वरुप होते.


Charles Sobhraj Admirer Hotel Conman
Moharram Procession Case: उंदराचे विष.. पेन किलर गोळ्या; अन् मोहर्रममध्ये १५०० लोकांना मारण्याचं प्लॅनिंग, हा कसला सूड?

रायपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बिंगसन जॉन याने २७ जून रोजी रायपूरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्‍ये मुक्‍काम केला. येथे ६३,७५५ रुपयांचे बिल न भरता आणि १.४८ लाख रुपये किमतीचा भाड्याने घेतलेला लॅपटॉप घेऊन तो पसार झाला. या प्रकरणी गुन्‍हा दाखल होताच. ७२ तासांच्या आत जॉनला भुवनेश्वरमधून अटक करण्यात आली.


Charles Sobhraj Admirer Hotel Conman
Crime news | तब्बल १,४०० किलोमीटरचा प्रवास...पाठीवर बॅग अन् सोबत लहान मूल! प्राध्यापिकेच्या हत्येचे गूढ पोलिसांनी कसं उकललं?

तीन दशकांहून अधिक काळ फसवणुकीची मालिका, ३०० हॉटेल्सना गंडा

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, जॉनच्या कबुलीजबाबामुळे तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या फसवणुकीच्या मालिकेचा उलगडा झाला. जॉनने दावा केला आहे की, १९९० पासून त्याने १० हून अधिक राज्यांमधील सुमारे ३०० हॉटेल्सना आपले लक्ष्य बनवले होते. हॉटेल कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी तो अनेकदा परदेशी टूर गाइड, इंग्रजी शिक्षक किंवा योग प्रशिक्षक असल्याचे भासवायचा.


Charles Sobhraj Admirer Hotel Conman
Nagpur robbery case : रस्ता विचारणे पडले महागात; बुटीबोरीत दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटले

'सिरीयल किलर' चार्ल्स शोभराज रोल मॉडेल

चार्ल्स शोभराज याची 'सिरीयल किलर' अशी ओळख आहे. तो जगातील सर्वात कुप्रसिद्ध सिरीयल किलर आणि ठगांपैकी एक होता. भारतीय वडील आणि व्हिएतनामी आई असणार्‍या शोभराजने १९७० च्या दशकात आशियातील "हिप्पी ट्रेल"वरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना लक्ष्य करून लुटले. तपास अधिकाऱ्यांनी त्याला थायलंड, नेपाळ आणि भारत यांसारख्या देशांमधील २० हून अधिक लोकांच्या हत्येशी जोडले होते. पर्यटकांशी मैत्री करणे, त्यांना गुंगीचे औषध देवून मौल्यवान वस्तू चोरणे आणि यानंतर त्‍यांची हत्या करणारा तो सिरीयल किलर होता. त्याच्यावर आधारित पुस्तके, माहितीपट आणि वेबसीरिजही तयार करण्यात आली आहे.


Charles Sobhraj Admirer Hotel Conman
Honey trap case nagpur सावधान ! तरुणीच्या मिस्ड कॉलला भुलला अन् ४ लाख गमावले; 'हनी ट्रॅप'चे नागपुरात नवे जाळे

बिंगसन जॉनने विविध तुरुंगांमध्ये भोगलाय सुमारे १५ वर्षे कारावास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला बिंगसन जॉनने फसवणुकीचा पहिला गुन्‍हा केला. यानंतर त्‍याने फसवणुकीच्या मालिकेची सुरुवात केली. १९९६ मध्ये त्याला पहिल्यांदा अटक करण्यात आली. तिहार कारागृहात त्‍याचा मुक्‍काम होता. तेव्हापासून, तपास अधिकाऱ्यांच्या मते, त्याने देशातील विविध तुरुंगांमध्ये जवळपास १५ वर्षे घालवली आहेत; तसेच सुटकेनंतर तो वारंवार हॉटेल्समधील फसवणुकीच्या गुन्ह्यांकडे वळला आहे.

तुरुंग 'होम-स्टे' तर फाईव्ह स्टार हॉटेल्स 'पर्यटन स्थळ'

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, जॉन तुरुंगाला आपले "होम-स्टे" (घरगुती मुक्काम) आणि आलिशान हॉटेल्सना 'पर्यटन स्थळे' मानत असे. त्याला पंचतारांकित हॉटेल्समध्ये किंवा तुरुंगात जेवण करणे पसंत होते. रायपूरमधील हॉटेलमध्ये दोन दिवस राहिल्यानंतर जॉनने कर्मचाऱ्यांना लॅपटॉपची व्यवस्था करण्यास सांगितले. ऑफिसच्या कामासाठी त्याची तातडीने गरज असल्याचे त्याने कारणही त्‍याने दिले. लॅपटॉप मिळाल्यानंतर त्‍याने पोबारा केला. हॉटेलने तक्रार केल्यानंतर, रायपूरमधील गुन्‍हे प्रतिबंधक आणि सायबर युनिटने तपास सुरु केला. हॉटेलमध्‍ये राहण्‍यासाठी त्‍याने वापरलेली ओळखपत्रे आणि मोबाईल क्रमांकांची तपासणी करण्‍यात आली. मोबाईलवरुन जॉनला भुवनेश्वरमध्‍ये असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. येथे जावून रायपूर पोलिसांन त्‍याला बेड्या ठोकल्‍या. लॅपटॉपही हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्यावर 'भारतीय न्याय संहिते'च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news