Honey trap case nagpur सावधान ! तरुणीच्या मिस्ड कॉलला भुलला अन् ४ लाख गमावले; 'हनी ट्रॅप'चे नागपुरात नवे जाळे

सलोनीने आपल्या जाळ्यात ओढून युवराजला 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवले
Honey Trap
Honey TrapPudhari
Published on
Updated on

नागपूर : एका तरुणीच्या मिस्ड कॉलवर विश्वास ठेवणे बुटीबोरी येथील एका विवाहित तरुणाला भलतेच महागात पडले आहे. 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवून दरोडेखोरांनी या तरुणाला चाकूचा धाक दाखवत तब्बल ४ लाखांपेक्षा अधिक रुपयांचा ऐवज आणि रोकड लुटल्याची धक्कादायक घटना अजनी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कुकडे लेआउट येथे घडली आहे.

मिस्ड कॉल अन् प्रेमाचे नाटक

फिर्यादी युवकाचे नाव युवराज (वय २५, रा. बुटीबोरी) असे आहे. युवराज विवाहित असून तो कॉलेजमध्ये फार्मसीचे शिक्षण घेत आहे. तसेच त्याच्या वडिलांचे रेडीमेड कापड विक्रीचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी युवराजच्या मोबाईलवर 'सलोनी' नावाच्या एका तरुणीचा मिस्ड कॉल आला होता. या मिस्ड कॉलवरून सुरू झालेल्या संभाषणाचे पुढे नियमित बोलण्यात रूपांतर झाले. सलोनीने आपल्या जाळ्यात ओढून युवराजला 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवले आणि शुक्रवारी त्याला भेटण्यासाठी अजनी भागात बोलावून घेतले.

Honey Trap
Pune Police Bribery: पुणे पोलिस दलात लाचखोरीचे ग्रहण; 3 अधिकारी जाळ्यात

अजनी परिसरात रचला सापळा

ठरल्याप्रमाणे युवराज अजनी भागात पोहोचला आणि त्याने सलोनीच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सलोनीऐवजी तिथे अचानक एक अज्ञात युवक आला. पाहता पाहता त्याचे इतर तीन साथीदारही तिथे पोहोचले. युवराजने त्यांना, "तुम्ही कोण आहात?" अशी विचारणा केली असता, चौघांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

Honey Trap
Beed Crime News : केजमध्ये दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटले; पोलिसांनी अवघ्या ४ तासांत दोघांना केले जेरबंद

चाकूचा धाक दाखवून थरारक लूट

दरोडेखोरांनी युवराजला जबरदस्तीने एका ऑटोमध्ये बसवले, तर त्यांच्या एका साथीदाराने युवराजची मोटरसायकल बाजूला लावली. ऑटोमध्ये चौघांनी युवराजला चाकूचा धाक दाखवला आणि त्याच्या जवळील मोबाईल, सोन्याची साखळी आणि ब्रेसलेट असा एकूण सव्वाचार लाखांचा ऐवज जबरदस्तीने लुटला.

Honey Trap
Chhatrapati Sambhajinagar crime : सिडको ठाण्याच्या 100 फुटांवर तरुणाची हत्या, तब्बल 7 तासांनंतर पोहोचले पोलिस

कारमधून थेट बुटीबोरी गाठले; घरातूनही रोकड लंपास

एवढ्यावरच दरोडेखोरांचे समाधान झाले नाही. लुटमार केल्यानंतर एका आरोपीने मोबाईलवरून आपल्या दुसऱ्या साथीदाराला कार घेऊन बोलावून घेतले. तो साथीदार MH-49-BW-3042 क्रमांकाची कार घेऊन घटनास्थळी आला. यानंतर पाचही आरोपींनी युवराजला त्याच कारमध्ये बसवले आणि थेट बुटीबोरी येथील त्याच्या घरी घेऊन गेले. तिथे आरोपींनी त्याच्या घरातून १ लाख ९९ हजार रुपयांची (५०० च्या नोटांच्या स्वरूपातील) रोकड ताब्यात घेतली आणि कारसह पोबारा केला.

Honey Trap
Parbhani Crime | पूर्णा येथे वकिलाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी; ४५ लाखांच्या खंडणीप्रकरणी तिघे जेरबंद

पोलिसांत तक्रार दाखल

या धक्कादायक प्रकारानंतर युवराजने आधी बुटीबोरी पोलिस ठाणे गाठले, मात्र घटना अजनी परिसरात घडल्याने अखेर या प्रकरणी युवराजने अजनी पोलिसांत अधिकृत तक्रार नोंदवली आहे. पोलिस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news