Moharram Procession Case: पत्नीपासून विभक्त राहिल्याने फैयाजमध्ये सूडाची भावना?

मोहरम मिरवणुकीत गोळ्या वाटप प्रकरण
Moharram Procession Case
Moharram Procession CasePudhari
Published on
Updated on

मुंबई: मोहरमच्या मिरवणुकीत उंदराचे विष म्हणवल्या जाणार्‍या झिंक फॉस्फाइडमिश्रीत गोळ्या वाटप प्रकरणात अटक केलेला फैयाज प्रेमजी गेल्या काही वर्षांपासून पत्नीपासून विभक्त राहत होता. त्याला संपूर्ण जगाचा राग होता, याच रागातून सूड घेण्यासाठी त्याने सदरचा गुन्हा केला का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

फैयाजला कडेकोट पोलीस बंदोबस्तात शनिवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान त्याच्या वडिलांची जबानी नोंदविण्यात येणार असून या जबानीतून काही गोष्टींचा खुलासा होणार आहे. दरम्यान त्याच्याकडून जप्त केलेल्या सर्व वस्तूसह गोळ्यांचा साठा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे.

Moharram Procession Case
Fourth Mumbai Project| चौथी मुंबई गेमचेंजर ठरणार: मुख्‍यमंत्री

शुक्रवारी मोहरम असल्याने भायखळा परिसरात एका मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जवळपास अडीच ते तीन लाख लोक सामील झाले होते. भायखळ्याच्या अंजीरवाडी येथून निघालेल्या या मिरवणुकीत फैयाज प्रेमजी सामील झाला होता. याच मिरवणुकीत सलमान सय्यद हा आला होता.

तो मूळचा गोवंडीचा रहिवासी असून मातम केल्यानंतर त्याने थोडा आराम करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान त्याला बुरखाधारी महिलेने वेदनाशामक गोळ्या दिल्या. या गोळ्या घेतल्यानंतर तो त्याच्या गोवंडीतील घरी निघून गेला. काही वेळानंतर त्याला त्रास होऊ लागला आणि त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अशाच प्रकारे मिरवणुकीत सामिल झालेल्या इतर चार ते पाचजणांना त्रास झाला होता. या सर्वांना संबंधित वेदनाशामक गोळ्या घेतल्या होत्या. हा प्रकार भायखळा पोलिसांना समजताच त्यांनी त्या गोळ्यांचे वाटप करणार्‍या व्यक्तीचा शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना पोलिसांनी फैयाज प्रेमजीला ताब्यात घेतले होते. चौकशीत तो पुण्याचा रहिवाशी असून मोहरम मिरवणुकीसाठी मुंबईत आला होता, असे उघड झाले. मुंबईत आल्यानंतर तो डोंगरीतील एका गेस्ट हाऊसमध्ये राहत होता. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना काही गोळ्या सापडल्या. त्याच्या गेस्ट हाऊसमधील रुममध्ये छापा टाकल्यानंतर तिथे पोलिसांना १४ हजार ९०० कॅप्सुल सापडल्या.

तपासात या गोळ्या झिंक फॉस्फाईटमिश्रीत होत्या. त्यात शरीरात गेल्यानंतर ते पोटातील आम्लांशी अभिक्रिया करते. त्यातून फॉस्फिन वायू बाहेर येऊन रक्तप्रवाहात मिसळतो. त्यामुळे शरीरातील पेंशींना ऑक्सिजन न मिळाल्यास त्रास होतो. काही अवयव निकामी होण्याची शक्यता असते. या प्रकारानंतर फैयाज प्रेमजीविरुद्ध भायखळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

आतापर्यंत पोलीस तपासात फैयाज हा पुण्यातील विमाननगरचा रहिवाशी असून तो तिथे त्याच्या वडिलांसोबत राहतो. ते दोघेही रंग बनविण्याच्या कारखान्यात कामाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी तो पुण्यातून मुंबईत आला होता. त्यानतर तो डोंगरीतील एका गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास होता. याच गेस्ट हाऊसमधील रुममधून पोलिसांनी तीस हजार गोळ्या सापडल्या.

Moharram Procession Case
Western Railway Local Disruption: तांत्रिक बिघाड नव्हे; मोटरमनने सिग्नल तोडले

त्यापैकी १४ हजार ९०० गोळ्यामध्ये झिंक फॉस्फाईड भरले होते. त्याने ऑनलाईन ५० किलो झिंक फॉस्फाइड मागविले होते. याच गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास असताना त्याने प्रत्येक कॅप्सुलमध्ये एक ग्रॅम झिंक फॉस्फाईड भरले होते. ते सर्व साहित्य पोलिसांनी जप्त करुन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले आहे.

फैयाज त्याच्या वडिलांसोबत राहत होता, त्यामुळे त्याच्या वडिलांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यांची जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मोहरम मिरवणुकीत सामिल झाल्यानंतर सर्वांना वेदनाशामक गोळ्या वाटण्यामागे त्याचा उद्देश अधिकृत स्पष्ट झाला नाही, मात्र त्याला मोठ्या प्रमाणात जिवीतहानी घडवून आणायची होती का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्याच्या या कृत्यामागील कारणाचा अधिकृत खुलासा होऊ शकला नाही, त्यादृष्टीने त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

इराणमध्ये वास्तव्‍याचा उद्देश काय?

फैयाजची आई आणि बहीण इराणमध्ये वास्तव्यास आहे. बहीण डॉक्टर आहे. त्याने तिथे काही वर्षे काम केले होते. त्यांना भेटण्यासाठी तो २०२५ मध्ये इराणला गेला होता. त्यामागे त्याचा काय उद्देश होता याचाही तपास सुरु आहे. त्याच्या आईसह बहिणीची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.

याबाबत त्यांना लवकरच संपर्क साधून त्यांना मुंबईत येण्याची विनंती केली जाणार आहे. त्याच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि विष आदींच्या माध्यमातून दुखापत करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात तो पोलिसांना सहकार्य करत नाही, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news