Sonia Gandhi controversy : ‘राहुल गांधी मदारी! त्यांच्या आईने नागरिकत्व मिळण्यापूर्वीच मतदान कसे केले?’ : भाजपचा घणाघात

सोनिया गांधींच्या मतदार नोंदणीची पुन्हा चौकशी होणार; ‘लक्ष भरकटवण्यासाठीच काँग्रेसची नौटंकी’ - मंत्री गिरीराज सिंह यांची जोरदार टीका
Sonia Gandhi controversy : ‘राहुल गांधी मदारी! त्यांच्या आईने नागरिकत्व मिळण्यापूर्वीच मतदान कसे केले?’ : भाजपचा घणाघात
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांकडून सुरू असलेल्या आंदोलनावरून केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे. राहुल गांधी हे खऱ्या अर्थाने विरोधी पक्षनेते नसून केवळ ‘मदारी’ आहेत, असा घणाघाती टोला त्यांनी लगावला. व्यासपीठावर बसून नौटंकी आणि उपहास करणे हे जबाबदार विरोधी पक्षनेत्याचे काम नाही, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले. आपल्या कार्यकाळात पदाचा राजीनामा देणाऱ्या १५ निवडणूक आयुक्तांचा गौरव काँग्रेसनेच केला होता, असा दावा करत आज तीच काँग्रेस निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्न उपस्थित करत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. काँग्रेसची ही भूमिका म्हणजे ‘चोरानेच चोरीविरुद्ध बोंब ठोकण्यासारखी’ असल्याची टीका त्यांनी केली.

सोनिया गांधींच्या नागरिकत्वावर थेट बोट

केवळ निवडणूक आयोगावरच नव्हे, तर गिरीराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरूनही गंभीर सवाल उपस्थित केले. सोनिया गांधी यांनी भारतात आल्यानंतर तब्बल १५ वर्षे देशाचे नागरिकत्व का स्वीकारले नव्हते, असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला. शिवाय, भारतीय नागरिकत्व नसतानाही त्यांनी निवडणुकीत मतदान कसे केले, असा थेट आरोप त्यांनी केला. सोनिया गांधी यांच्या संदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे या मूळ प्रकरणावरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठीच काँग्रेस निवडणूक आयोगाला लक्ष्य करत आहे. काँग्रेसने भूतकाळात निवडणूक आयोगाला स्वतःचे राजकीय हत्यार बनवल्याचा आरोपही सिंह यांनी यावेळी केला.

Sonia Gandhi controversy : ‘राहुल गांधी मदारी! त्यांच्या आईने नागरिकत्व मिळण्यापूर्वीच मतदान कसे केले?’ : भाजपचा घणाघात
S Jaishankar vs Pakistani Journalist: ‘दहशतवादी देश मला हा प्रश्न विचारतोय?’; पाक पत्रकाराला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी धुतले

‘आता सोनिया गांधी तुरुंगात जातील’

आपला हल्ला अधिक तीव्र करताना गिरीराज सिंह म्हणाले की, नागरिकत्व नसताना आईने मतदान कसे केले, याचे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी आधी देशाला द्यावे. सोनिया गांधी आता तुरुंगात जाणार आहेत, असा दावा करत त्यांनी राहुल गांधींवरही वैयक्तिक टीका केली. राहुल गांधी स्वतःची जात आणि धर्म उघड करत नसल्याचे नमूद करत आगामी जनगणनेदरम्यान अर्बन नक्षलवाद्यांची जात कोणती असते, हे त्यांना सांगावेच लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

Sonia Gandhi controversy : ‘राहुल गांधी मदारी! त्यांच्या आईने नागरिकत्व मिळण्यापूर्वीच मतदान कसे केले?’ : भाजपचा घणाघात
CJP Protests: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी सुरू असतानाच सौरव, अभिजीत आणि आशुतोष यांच्या अडचणी वाढल्या; हायकोर्टात सुनावणी

नेमके काय आहे सोनिया गांधी यांच्या नागरिकत्वाचे प्रकरण?

सोनिया गांधी यांनी १९८३ मध्ये भारताचे नागरिकत्व स्वीकारले होते. मात्र, नागरिकत्व मिळण्याच्या तीन वर्षे आधीच म्हणजेच १९८० च्या सुमारास त्यांचे नाव मतदारयादीत समाविष्ट करण्यात आले होते, असा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हा (एफआयआर) दाखल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर फेरसुनावणी घेण्याचा मार्ग दिल्लीतील एका सत्र न्यायालयाने मोकळा केला आहे. यापूर्वी महानगर दंडाधिकाऱ्यांनी सोनिया गांधी यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याचे आदेश देण्यास नकार दिला होता. सत्र न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांचा तो आदेश रद्दबातल ठरवला आहे.

Sonia Gandhi controversy : ‘राहुल गांधी मदारी! त्यांच्या आईने नागरिकत्व मिळण्यापूर्वीच मतदान कसे केले?’ : भाजपचा घणाघात
CEC Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात वातावरण तापलं; कार्यक्रम स्थगित, काँग्रेसचा मोर्चा, पोलिसांत तक्रार, काय काय घडतयं?

राउज ॲव्हेन्यू न्यायालयातील सेंट्रल दिल्ली कोर्ट बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विकास त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर विशेष न्यायाधीश विशाल गोगने यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. दंडाधिकाऱ्यांचा जुना निकाल रद्द करताना न्यायालयाने स्पष्ट केले की, न्यायालयाच्या प्रत्येक आदेशामध्ये कायद्याप्रती निष्ठा आणि सत्यता असायला हवी, तथ्यांशी कोणतीही तडजोड करता कामा नये. या निकषावर तपासले असता अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या त्या आदेशात गंभीर कायदेशीर त्रुटी आढळत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news