New Telecom Rule: १ नोव्हेंबरपासून नवा नियम लागू; फोन वाजताच कळणार कोणाचा कॉल आहे, जाणून घ्या काय बदलणार

Caller Name Display India: 1 नोव्हेंबर 2026 पासून मोबाईलवर कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव आणि नंबर एकत्र दिसण्याची सुविधा सुरु होणार आहे.
New Telecom Rule
New Telecom RulePudhari
Published on: 
Updated on: 

Caller Name Display India: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आला की, तो नेमका कोणाचा आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. कधी बँकेच्या नावाने, तर कधी एखाद्या सरकारी योजनेच्या नावाने फोन करून लोकांची फसवणूक केली जाते. मात्र, आता फोनवर कॉल येताच संबंधित व्यक्तीचं नाव समजण्याची सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. दूरसंचार विभागाने यासंदर्भात नवा आदेश जारी केला असून, 1 नोव्हेंबर 2026 पासून हा नियम लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मोबाईलवर नंबरसोबत नावही दिसणार

नव्या नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीचा फोन आल्यावर मोबाईलच्या स्क्रीनवर केवळ त्याचा नंबरच नव्हे, तर त्याचं नावही दिसणार आहे. हे नाव संबंधित मोबाईलधारकाच्या दूरसंचार कंपनीकडे असलेल्या ग्राहक नोंदीतील माहितीनुसार दाखवले जाईल. यासाठी दूरसंचार विभागाने 13 ऑक्टोबर रोजी आदेश जारी केल्याचे सांगण्यात आले आहे. हा नियम सर्व दूरसंचार कंपन्यांसाठी लागू करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

फसव्या कॉल्सना आळा बसणार?

सध्या अनेकदा अनोळखी नंबरवरून फोन येतात. अशा वेळी फोन करणारी व्यक्ती कोण आहे, हे समजत नाही. त्यामुळे काही लोक महत्त्वाचे कॉल उचलत नाहीत, तर काही जण फसव्या कॉल्सना बळी पडतात.

New Telecom Rule
Imran Khan Notice: अभिनेता इमरान खानला भारत सोडण्याची नोटीस; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, नेमकं कारण काय?

कॉल करणाऱ्याचं नाव स्क्रीनवर दिसल्यास व्यक्तीची ओळख पटवणं तुलनेने सोपं होऊ शकतं. त्यामुळे अनोळखी कॉल्स ओळखण्यासाठी या सुविधेचा उपयोग होण्याची अपेक्षा आहे.

मात्र, केवळ नाव दिसत असल्याने फसवणूक होणार नाही, असं नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तीला बँकेची माहिती, ओटीपी किंवा इतर गोपनीय तपशील देताना नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे.

New Telecom Rule
Gold Silver Price Today: नवरात्रीत सोनं झालं स्वस्त; २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर पाचव्या दिवशी घसरले, जाणून घ्या आजचा भाव

सर्व मोबाईल ग्राहकांना काय फायदा होणार?

हा नियम लागू झाल्यानंतर मोबाईलवर येणाऱ्या कॉल्सची ओळख पटवण्यासाठी ग्राहकांना मदत होऊ शकते. विशेषतः अनोळखी नंबरवरून येणारे व्यावसायिक कॉल, जाहिरातींचे फोन आणि संभाव्य फसव्या कॉल्स ओळखताना ही सुविधा उपयुक्त ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news