BSNL controversy |अंतर्वस्त्रे, चप्‍पल, तेल... : कोण आहेत ५० अधिकाऱ्यांकडे २० कामे सोपविणारे BSNL संचालक विवेक बंजल?

व्‍हायरल पत्रानंतर प्रयागराज भेट रद्द, मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी दिले तत्‍काळ कारवाईचे आदेश
BSNL director controversy
BSNL संचालक विवेक बंजल यांच्‍या मागण्‍याचे पत्र सोशल मीडियावर व्‍हायरल झाले. यानंतर त्‍यांची प्रयागराज भेट रद्द करण्‍यात आली आहे. social media
Published on
Updated on

BSNL director controversy

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील प्रयागराज दौऱ्यापूर्वी BSNL संचालक विवेक बंजल यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना अंतर्वस्त्रे (Underwear) आणि केसांचे तेल विकत आणण्यासारखी वैयक्तिक कामे सांगितल्‍याचा प्रकार व्‍हायरल पत्रामुळे उघडकीस आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कडक पावले उचलली आहेत. हा प्रकार अत्यंत "अयोग्य आणि धक्कादायक" असल्याचे म्हणत त्यांनी बंजल यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रयागराज भेटसाठी काढला होता आदेश

अधिकृत आदेशानुसार, बीएसएनएल बोर्डाचे संचालक (सीएफए) बंजल २५ ते २६ फेब्रुवारी दरम्यान प्रयागराजला भेट देणार होते. तथापि, त्‍यांनी दिलेला अधिकृत आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्‍यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

BSNL director controversy
Khalistan supporter | "मी अजूनही थरथर कापत आहे..." : खलिस्तान समर्थकांच्‍या हल्‍ल्‍यानंतर कॅनडातील पत्रकाराने सांगितली 'आपबीती'

संचालक बंजल यांनी ५० अधिकार्‍यांकडे सोपवली २० कामे

आदेशानुसार, सुमारे ५० अधिकाऱ्यांना सुमारे २० कामे सोपवण्यात आली होती. प्रयागराजमध्ये पोहोचल्यानंतर बंजल यांना संगम येथे स्नान, यानंतर बोटीने प्रवास, बडे हनुमान मंदिर, अक्षयवत आणि पाताळपुरी मंदिरांना भेट द्यायची होती. यासाठी त्‍यांनी अधिकाऱ्यांच्या 'स्नान' किटमध्ये एक टॉवेल, अंडरवेअर, चप्पल (ऑफिस ऑर्डरमध्ये 'स्लीपर' म्हणून उल्लेख केलेला), कंगवा, आरसा आणि तेलाची बाटली होती. घाटावर सामान्य वापरासाठी एक बेडशीटची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. हॉटेल आणि सर्किट हाऊसमध्ये, एक ड्रायफ्रूट बाऊल, एक फ्रूट बाऊल, एक शेव्हिंग किट, एक टॉवेल, टूथपेस्ट, एक ब्रश, साबण, शॅम्पू, एक कंगवा आणि तेलाची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले होते, असे आदेशात म्हटले होते.

BSNL director controversy
Sanjay Raut |"रोहित पवार यांचा विजय..." : अजित पवारांच्‍या विमान अपघातावर संजय राऊत नेमकं काय म्‍हणाले?

बंजल यांना कारणे दाखवा नोटीस

या आदेशाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. बंजल यांच्याविरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि त्यांना सात दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

BSNL director controversy
Rohit Pawar | "आमच्या कुटुंबातील माणूस गेला..." : विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक

'बीएसएनएल'नेही केला खुलासा

या प्रकरणी 'बीएसएनएल'नेही स्पष्टीकरण दिले आहे की, 'नियमांचे उल्लंघन झाल्याची एक घटना आमच्या निदर्शनास आली आहे. ही बाब बीएसएनएलच्या धोरणांना आणि मूल्यांना धरून नाही. संबंधित व्यक्तींवर आम्ही योग्य कारवाई केली आहे. तसेच, सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या नियमांचे आणि शिस्तीचे काटेकोरपणे पालन करावे, अशा कडक सूचना पुन्हा एकदा देण्यात आल्या आहेत.

BSNL director controversy
No Caste Certificate |'जात नाही, धर्म नाही' प्रमाणपत्रासाठी करावा लागेल धर्मत्याग! जाणून घ्या हायकोर्टाने असा आदेश का दिला?

कोण आहेत बंजल ?

बंजल हे १९८७ च्या बॅचचे भारतीय दूरसंचार सेवा अधिकारी आहेत. त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकीची पदवी, संगणक शास्त्रात अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि एमबीए असे त्‍यांचे शिक्षण आहे. बीएसएनएल वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, त्यांना भारतात दूरसंचार नेटवर्क हाताळण्याचा त्‍यांना ३४ वर्षांहून अधिक अनुभव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news