

Canadian journalist alleges assault by Khalistanis : कॅनडामधील मुक्त पत्रकार मोचा बेझिरगन यांच्यावर आज खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला. व्हँकुव्हरमध्ये खलिस्तान समर्थकांच्या मार्चाचे वार्तांकन करताता हा प्रकार घडला आहे. मला धमक्या देण्यात आल्या. खलिस्तानशी संबंधित वार्तांकन केल्याबद्दल त्याला लक्ष्य करण्यात आले, असा दावाही त्यांनी केला आहे.
बेझिरगन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांच्या दुर्दशेबद्दल लिहिले की, 'हे फक्त २ तासांपूर्वीचे आहे आणि मी अजूनही थरथर कापत आहे. मला अनेक खलिस्तानी लोकांनी वेढले होते जे गुंडांसारखे वागत होते. त्यांनी मला घेरले, मला धमकावले, मारहाण केली. त्यांनी माझ्या हातातून माझा फोन हिसकावून घेतला.'
माझ्यावर हल्ला करील, असे खलिस्तानी समर्थक केला मला धमकावत होता. मी मागील काही दिवस कॅनडा, ब्रिटन , अमेरिका, न्यूझीलंडमध्ये खलिस्तानच्या निषेधांचे वृत्तांकन करत आहे. माझे एकमेव ध्येय स्वतंत्र पत्रकारिता करणे आणि घडणाऱ्या घटनांचे रेकॉर्डिंग करणे आणि वृत्तांकन करणे आहे. मी संपादकीयदृष्ट्या स्वतंत्र असल्याने काही लोकांना निराशा होते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
खलिस्तान समर्थक गटाचा एक चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांना भारताचा विरोध करण्यास आणि खलिस्तानच्या बाजूने येण्यास सांगितले जात आहे. अनेक सुविधांचे आमिष दाखवले जात आहे. कथित घटनेचा व्हिडिओ शेअर करताना बेझिरगन यांनी स्पष्ट केले आहे की, "अशा प्रकारच्या धमकी देणाऱ्या युक्त्या मला माझे कार्य करण्यापासून थांबविणार नाही. माझ्या संपादकीय स्वातंत्र्यावर परिणाम करणार नाहीत."