Sanjay Raut |"रोहित पवार यांचा विजय..." : अजित पवारांच्‍या विमान अपघातावर संजय राऊत नेमकं काय म्‍हणाले?

पार्थ पवार यांच्‍या जमीन घोटाळ्याचा विषय संपलेला नाही, त्‍यांच्‍या पाठीशी मुख्यमंत्री आहेत
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत
Published on
Updated on

Sanjay Raut on on VSR Ventures

मुंबई : नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्‍या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. हा राष्‍ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा मोठा विजय आहे. या प्रकरणी मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे . अजित पवार यांच्‍या त्यांचा कुटुंबातला नेता विमान अपघाताबाबत अभ्यास करत आहे या बद्दल आपण पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे मत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.२५) माध्‍यमांशी बोलताना व्‍यक्‍त केले.

रोहित पवारांकडून विमान अपघाताच्या तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास

व्हीएसआर व्हेंचर्सच्या विमानांच्या उड्डाणांवर डीजीसीएने बंदी घातली आहे. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, "हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांचा मोठा विजय आहे. अजित पवार यांच्या कुटुंबातील एक तरुण नेता विमान अपघाताच्या तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करत आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. या विषयावर मी स्वतः रोहित पवारांशी सविस्तर चर्चा करणार आहे."

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत
Sanjay Raut |"पहिला अधिकार शिवसेनेचा..." : राज्यसभा निवडणुकीबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

शरद पवार राज्‍यसभा लढविणार का, याबाबत माहिती नाही

देशभर राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहत असून महाराष्ट्रात ७ जागांसाठी निवडणूक होत आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले, महाविकास आघाडीची भूमिका: "एका जागेवर निर्णय घेताना महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना एकत्र बसून विचार करावा लागेल. प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार असावा असे वाटते, परंतु एकजूट महत्त्वाची आहे.शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. ते निवडणूक लढवणार का, याची मला कल्पना नाही. मात्र, त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली, तर आम्ही सर्वजण एकत्र येऊन निर्णय घेऊ. आम्ही एक आहोत आणि एकत्रच लढणार आहोत."

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत
Sanjay Raut | "जेव्हा पैशांचा विषय येतो..." : भारत-पाकिस्‍तान सामन्‍यावर संजय राऊत नेमकं काय म्‍हणाले?

पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याचा विषय अजून संपलेला नाही

अजित पवार गटावर टीका करताना राऊत यांनी गंभीर आरोप केले. "पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याचा विषय अजून संपलेला नाही. मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या पाठीशी उभे आहेत, त्यामुळेच या गोष्टी दाबल्या जात आहेत. सत्ताधारी एकत्र असल्यानेच हे सर्व सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबद्दल काही माहिती असेल तर त्यांनी ती उघड करावी," असे आव्हानही त्यांनी दिले.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत
Sanjay Raut | प्रफुल्ल पटेल पवार कुटुंबाचे मुखिया आहेत का? राष्ट्रवादी विलीनीकरणावर संजय राऊतांचा जळजळीत सवाल

डोनाल्ड ट्रम्प यांच्‍यावर कोणीही बोलत नाही

आंतरराष्ट्रीय राजकारणावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र, यावर पंतप्रधान किंवा सरकारमधील कोणीही काहीही बोलायला तयार नाही, ही आश्चर्याची बाब आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news